मराठा सेवा संघाचे कार्य उल्लेखनीय — आ. विक्रम काळे

मराठा सेवा संघाचे कार्य उल्लेखनीय -- आ. विक्रम काळे

उदगीर(एल.पी.उगीले) : मराठा सेवा संघाच्या उदगीर शाखेचे कार्य उल्लेखनीय समाजातील सर्व घटकांना योग्य न्याय देत गुणवंताचे कौतुक करणे, त्यांचा सत्कार करणे अशा पद्धतीचे कार्य हाती घेतल्यामुळे समाजामध्ये त्यांची प्रतिमा आणखीच उंचावली आहे असे गौरवोद्गार शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी काढले ते उदगीर येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
या प्रसंगी उदगीरचे आ. तथा माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना 3 ए हा कानमंत्र लक्षात ठेवण्यासाठी सांगितला. येम, एटीट्यूड आणि ॲक्शन हे आपल्या जीवनामध्ये असले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. आपले ध्येय साकार करण्यासाठी आपला दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण कृतिशील असले पाहिजे. असा संदेश त्यांनी दिला. मराठा समाजाच्या वसतीगृह निर्मितीसाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण उदगीर शहरांमध्ये हे वसतीगृह उभे करू असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विवेक सुकणे यांनी मराठा समाजासाठी जागेसह वसतीगृह उदगीर येथे देण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संपर्कप्रमुख किशनराव बिरादार व कार्यकारी अभियंता मुंबई मनपा विठ्ठलराव जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मराठा सेवा संघ उदगीर शाखेच्या वतीने मागील वीस वर्षापासून सातत्याने होणारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राधेकृष्ण मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आ. संजय बनसोडे आणि मराठवाडा विभागाचे शिक्षक आ. विक्रम काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमांमध्ये सलग चौथ्यांदा मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार मधून निवडून आल्याबद्दल आणि शिक्षकांची कामे तळमळीने करीत असल्याबद्दल मराठा सेवा संघ उदगीरच्या वतीने विक्रम काळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शिवशंकर पाटील आणि शिरीष रोडगे यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचाही सत्कार या कार्यक्रमांमध्ये करण्यात आला.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे यांनी मराठा सेवा संघाची भूमिका आणि प्रास्ताविक मांडत असताना विद्यार्थ्यांनी जात धर्म या गोष्टीकडे न वळता संवैधानिक मूल्य आत्मसात करायला हवी आहेत, आणि ही मूल्ये समाजामध्ये रुजविण्याचे काम मराठा सेवा संघ सातत्याने 33 वर्षापासून करीत असल्याचे सांगितले. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका, जिल्हा या ठिकाणी मराठा विद्यार्थी वसतीगृह उभे करण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मुल्ये प्रत्येक नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी मराठा सेवा संघाचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात बबीता पाटील यांनी जिजाऊ वंदनेने केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर प्रा. डाॅ. सुधीर जगताप (अध्यक्ष स्वामी विवेकानंद शि.प्र.मं. उदगीर), केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन लातूरचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश साखरे , कोनाऴे कोचिंग क्लासेस उदगीरचे संचालक आबा कदम, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव बालाजी जाधव, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष अनिताताई जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पुष्पाताई जाधव तर स्वागताध्यक्ष म्हणून मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर आणि बिपिन पाटील हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव हलगरे, राजकुमार कानवटे, ज्ञानेश्वर नकुरे, कालिदास बिरादार , भरत पुंड, गणपत गादगे, महादेव विश्वनाथे, भास्कर मोरे, डाॅ. विजयकुमार मोरे, डाॅ. निवृत्ती तिरकमटे, अंकुश हुंडेकर, दीपक मिरजकर, संदीप जाधव,संदीप नाईक, राजकुमार माने, नागनाथ काळे, कमलाकर मुळे, निवृत्ती जवळे , सुजित जाधव, गजानन बिरादार, मनोज बिरादार,शिल्पा ईंगळे,अनिता जगताप ,वंदना भोसले ,मिरा मोरतळे,सुनिता गरड ,चारूशिला पाटील ,जयमाला काळे , यांनी प्रयत्न केले.

About The Author