श्यामलाल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

श्यामलाल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये 21 जून हा दिन आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संस्थाध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व सर्वांनी नियमितपणे शारीरिक व्यायाम, योगासन,प्राणायाम करून आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी साठी प्रयत्न करावेत असा शुभेच्छा संदेश दिला.

तसेच संस्था उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, संस्था सचिव ऍड.विक्रम संकाये, संस्था सहसचिव अंजुमनीताई आर्य यांनीही सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या “करो योग, रहो निरोग “या शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेमध्ये योगासन प्राणायाम यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन योगसाधक बेदडे जी. के. यांनी केले. त्यानिमित्य मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, पर्यवेक्षक राहुल लिमये प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विवेक उगिले, प्राध्यापक वसंत गोखले, संस्कृत विषय विभाग प्रमुख प्रमोद कावरे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, व विद्यार्थी जीवनात नियमितपणे योग,प्राणायाम, ध्यानधारणा करण्याचे महत्त्व यासंबंधी मार्गदर्शन केले.

सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला, विविध योगासनाचे प्रकार व त्यांचे महत्त्व, फायदे यासंबंधी मार्गदर्शन योग साधक बेदडे जी. के. यांनी सखोलरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कावरे प्रमोद, दिनेश बोळेगावे, उमाकांत सूर्यवंशी, शेख सईद, बसवराज स्वामी,राजकुमार बिरादार,एन.सी. सी. कॅडेट्स,शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी प्रतिनिधी विश्वनाथे आकांक्षा,कस्तुरे शिवलीला, कावळे वैष्णवी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author