शेतकरी संघटनेचा लातूर येथे ‘शेतकरी पारतंत्र्य मेळावा’ संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने दि.१८ जून रोजी पत्रकार भवन लातूर येथे ‘शेतकरी पारतंत्र्य मेळावा ‘आयोजित करण्यात आला होता. १८ जून १९५१ रोजी मुळ घटनेत बिघाड करुन परिशिष्ट ९ मध्ये २८४ कायदे घातले गेले त्यापैकी २५० पेक्षा अधिक कायदे शेतकरी विरोधी आहेत,जे शेतकऱ्यांना पारतंत्र्यात घालतात. त्यामुळे १८ जून हा शेतकरी संघटनेच्या वतीने काळा दिवस म्हणून निषेध करण्यात आला.सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण असल्याचे शरद जोशी यांनी सांगितले आहे. ही धोरणे बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कायदेशीर व राजकीय लढाई लढण्याची आवश्यकता असून शेतकरी संघटना यापुढे शेतकऱ्यांच्या बाजार व तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी व्यापक लढाई उभी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा बहाळे पाटील, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, शेतकरी संघटनेचे विश्वस्त अनंतराव देशपांडे, राजीव बसर्गेकर, अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लातूर जिल्हा शेतकरी संघटनेचे उच्चाधिकार समिती सदस्य माधव कंदे, माधवराव मल्लेशे, शिवाजी पाटील नदीवाडीकर, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, बाबाराव पाटील, समन्वयक मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष कालिदास भंडे, वसंत कंदगुळे, हरिश्चंद्र सलगरे, कल्याणाप्पा हुरदळे, किशनराव शिंदे, शंकर निला, केशव धनाडे, दत्ता गुंजूटे, अशोक काळे, प्रकाश पंडगे, जनार्दन पाटील, राजकुमार वागलगावे, भूजंग रेड्डी, रमेश पाटील, आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.