चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, डि.वाय.एस.पी दिलीप भागवत व सेवानिवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय पवार यांचा सत्कार संपन्न

चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, डि.वाय.एस.पी दिलीप भागवत व सेवानिवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय पवार यांचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व आपल्या कार्याच्या बळावर वेगळा ठसा उमटविलेल्या चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उदगीरचे नूतन कर्तव्यदक्ष, अभ्यासू, विकासाची जाण असलेले उपजिल्हाधिकारी मा.सुशांत शिंदे साहेब, उदगीरचे नूतन दबंग उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) मा.दिलीप भागवत साहेब यांचा सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेले शासकीय रुग्णालय, उदगीरचे वैद्यकीय अधीक्षक मा.डॉ.दत्त्तात्रय पवार साहेब याचा सत्कार करून पुढील निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्या देण्यात आल्या. चंदरआण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते मा.श्रीकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या या कर्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सहकारमहर्षी मा.चंदरआण्णा वैजापूरे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मा.गोविंदआण्णा केंद्रे, तहसीलदार मा.रामेश्वर गोरे, खरेदी-विक्री संघांचे चेअरमन मा.भरतभाऊ चामले, सहकार क्षेत्राचे सहाय्यक निबंधक मा.बी.एस. नांदापूरकर साहेब, माजी उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, सहयोग बँकेचे माजी CEO मा.सुनीत देशपांडे, भाजपचे ज्येष्ठ नेते मा.सुधीर पाटील, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, सुप्रसिद्ध विधितज्ञ् रमाकांत पाटील, माजी नगरसेवक मा.पाशाभाई मिर्झा, माजी नगरसेवक मा.साईनाथ चिमेगावे, बामणीचे सरपंच राजकुमार बिरादार, नेत्रगावचे सरपंच बालाजी बिरादार, गुरधाळचे उपसरपंच मा.नंदकुमार पटणे, प्रा.डॉ. नाथराव मोरे, प्रा.डॉ.दत्तात्रय मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस मंचावर उपस्थित सत्कार मूर्तिनचा व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर भरतभाऊ चामले, डॉ.दत्तात्रय पवार, तहसीलदार रामेश्वर गोरे, डि.वाय.एस.पी दिलीप भागवत, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे याची यथोचित भाषणे झाली त्यानंतर गोविंदआण्णा केंद्रे यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.*यावेळी विश्वनाथ बिरादार,कल्याण बिरादार,तानाजी जाधव,विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर,प्रा.प्रदीप विरकपाळे सर,सुरज वैजापुरे,प्रा.स्वामी सर नागलगावकर,अजय शेटकार,अॅड बस्वराज मुळे,अॅड महेश मळगे,प्रा.जामकर सर,चौधरी सर,मुन्ना सुर्यवंशी, आखिलभाई,संतोष सुर्यवंशी,ज्ञानेश्वर मोरे,नितीन मुस्कावाड,बाळासाहेब नवाडे,रमेश खंडोमलके,राजकुमार कपाळे,संजय आडे,हमपल्ले सर,ऐतवार सर,महेश नवाडे,विजयकुमार सुवर्णकार,माधव पाटील चिघळीकर,बबलु शेल्हाळकर,गुरुनाथ पाटील बनशेळकीकर,ब्रम्हानंद हिप्पळगावकर,संदीप देशमुख,अजित काबंळे,सुगावकर सर,मुंडे सर,बावगे भाऊजी,चेतन परशेन्ने,भुसनवाड सर,सुगावे स्वामी,अविनाश खरात,राहुल पाचांळ, उपस्थित होते.

About The Author