मातृभूमी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल ,मातृभूमी नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश उस्तुरे , संस्थेच्या सचिव प्रा उषा कुलकर्णी, मनोज गुरुडे व योग प्रशिक्षिका आश्विनी शेळके यांंची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी योग प्रशिक्षक उषा कुलकर्णी व आश्विनी शेळके यांनी विविध प्रकारांचे योग प्रात्यक्षिक सादर केले. योग शिबिरासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना योग प्रशिक्षक् उषा कुलकर्णी म्हणाल्या, आपल्या दररोजच्या धावपळीच्या जीवनात शरीर व मन सदृढ असले पाहिजे. शरीर चांगले तर मन चांगले व मन चांगले तर शरीर चांगले, म्हणून शरीर व मन चांगले रहाण्यासाठी प्रत्येकानी नियमितपणे योगा केला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले. आभार प्रा. रणजित मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वंयसेवकांनी परिश्रम घेतले.