जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक योगा दिवस साजरा
उदगीर(प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने आज सकाळी 8 वाजता शाळेच्या प्रागणात 9 वा जागतिक योगा दिवस ‘हर आंगण योग’ हा संदेश देत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या जागतिक योगा दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्याना योगाचे महत्त्व सांगण्यात आले.
सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन योगा शिक्षक राजू मोरे, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री,जय हिंद पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य श्रीकांत शिवराम, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ.शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, योगा शिक्षक संदीप पवार, क्रीडा शिक्षक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्याना वृक्षासन, तडासन, पादहस्तासन, अर्ध चक्रसन, त्रिकोन आसन, अर्ध वृक्षासन, शशांक आसन, वक्रासन, भुजंग आसन, शलभासन, सेतुबंधासन, उतांन पादासन,अर्ध हलासन, पवान मुक्तासन, श्वासन, कपालभाती, नाडीशोधन, प्राणायम, ध्यान, शांतीपाठ,योग गीत, इ. योगाचे प्रकार विद्यार्थ्याकडून स्वतः करून घेण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश वाघमारे, श्रद्धा जाधव, संध्या लोहकरे, उषा सोमवंशी,झेबा मॅडम, भक्ती वैराळे, नीलकंठ सबनीस, सुशांत जाधव, सूर्यकांत कांबळे, काटे सर, राठोड सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीनी परिश्रम घेतले.