गंभीर गुन्ह्यातीत आरोपीस युनिट- कडुन १२ तासाच्या आत अटक
पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहरातील फरारी आरोपी व रेकार्डवरील आरोपींनचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठांचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी अधिकारी श्री. क्रांतीकुमार पाटील. पो. उपनिरिक्षक नितीन कांबळे व युनिट २ कडील पोलीस अंमलदार यांना वरिष्ठांचे आदेशान्वये कायदेशीर कारवाई बाबत आदेश दिले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/०६/२०२३ रोजी खुनाचा प्रयत्न केलेबाबत गंभीर गुन्हा दाखल झाला असुन. सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत वरिष्ठांकडुन आदेश प्राप्त झाले होते.
त्याप्रमाणे युनिट २ प्रभारी श्री. क्रांतीकुमार पाटील यांनी पोलीस उप निरिक्षक नितीन कांबळे यांचे सोबत युनिट २ कडील अंमलदार यांचे पथक तयार केले होते. सदर पथक गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस उप निरीक्षक नितीन कांबळे व पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांना बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की. सदर गुन्ह्यातील आरोपी कात्रज गाव खंदारे चाळ येथे आलेला असुन त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा लाईनचा फुल भाईचा शर्ट तसेच पांढऱ्या शर्ट घातलेला आहे. त्याप्रमाणे युनिट प्रभारी अधिकारी यांना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनाखाली नमुद पथकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन त्यांना ओळख सांगुन त्यांची नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पोपट नामदेव माळवे वय ४२ वर्ष रा. कात्रज भैरवनाथ मंदिर शेजारी कात्रजगाव पुणे असे सांगीतले. सदर बाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे खात्री करत नमुद आरोपीता विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु. र. क्र.४०३/२०२३ भा.द.वि. कलम ३०७.३२३.५०४. आर्म अॅक्ट कलम ४(२५) सह मपो अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल असलेबाबत माहीती प्राप्त झाली. नमुद आरोपीतांची ससुन हॉस्पीटल येथे वैदयकिय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी भारती विद्यापीठ पो. स्टे. पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक. अप्पर पोलीस आयुक्त. गुन्हे श्री. रामनाथ पोकळे. उप – आयुक्त गुन्हे. अमोल झेंडे. सहा. पो. आयुक्त गुन्हें. श्री. सुनिल पवार. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक. श्री. क्रांतीकुमार पाटील. गुन्हे शाखा. युनिट-२. पुणे शहर. पोउपनि नितीन कांबळे . पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे. शंकर नेवसे. अमोल सरडे. पुप्पेद्र चव्हाण. समीर पटेल. मोहसीन शेख. निखिल जाधव, साधना ताम्हणे व नागनाथ राख यांनी केलेली आहे.