प्रवासाकडे पाहण्याची दृष्टी देणारी साहित्य कृती म्हणजे लंडनवारी होय – डॉ.संजय जमदाडे
उदगीर (एल.पी.उगीले) – परिसर बदलला की परिस्थिती बदलते, तेथील वातावरण, सामाजिक परिस्थिती, त्यांच्या चालीरीती, व्यवहार, आहार- विहार या सर्वाबरोबरच आवडी-निवडी देखील बदलत असतात. या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपला प्रवास घडला पाहिजे. अशा या प्रवासाकडे पाहण्याची दृष्टी देणारी साहित्यकृती म्हणजे लंडनवारी होय. असे मत डॉ. संजय जमदाडे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या 291 व्या वाचक संवादात डॉ. एस. एस. कुलकर्णी लिखित लंडनवारी या साहित्यकृतीवर प्रसिद्ध कवी, चित्रपट कलाकार, सामाजिक कार्यकर्ते व अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित डॉ. संजय जमदाडे यांनी संवाद साधला. रमेश अंबरखाने यांच्या अध्यक्षतेखाली संवाद साधताना ते म्हणाले की, एखाद्या नवख्या प्रदेशातील वास्तव्य किंवा प्रवास करत असताना भेटणाऱ्या नवख्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, चालीरीती, खानपान या सगळ्यांना समजून घेत असताना प्रवासातील सहप्रवासी, कर्मचारी, वाहनांचे नियम आणि आपला स्वाभाव यांची सांगड घालत असता येणाऱ्या अडचणी आणि घडणारे विनोद यांचे सुंदर चित्रण लेखकांनी मजेशीरपणे केले आहे.
शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजपाल पाटील यांनी केले तर आभार प्रा.अंतेश्वर चालवा यांनी मानले.