पतंजली योग समितीच्या कार्यालयाच्या वास्तूचे पूजन संपन्न

पतंजली योग समितीच्या कार्यालयाच्या वास्तूचे पूजन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : पतंजली योग समितीच्या स्वतःच्या मालकीच्या कार्यालयाचे वास्तुपूजन व उद्टघाटन केंद्रीय राज्यमंत्री ना.भगवंत खुब्बा यांच्या शुभ हस्ते पार पडले. याप्रसंगी उदगीरचे आ. संजयजी बनसोडे, माजी आ. सुधाकररावजी भालेराव ,व्यकंट बेद्रे, मनोज पुदाले, दत्ता पाटील, आनंदराव बुंदे, साईनाथ चीमेगावे, अरुणा चीमेगावे,उत्तरा कलबूर्गे, सरोजा वारकरे,पंतजलि योग समितीचे संरक्षक उमाकांत अंबेसंगे, नरेंद्र यंदे, प्रा. बसलिंग गारठे, अध्यक्ष सुरेन्द अक्कनगीरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वास्तु पुजा व यज्ञ, हवन ने करण्यात आली . सौ. सविता नरेंद्र यंदे, सौ. जयश्री श्रीराम चामले, सौ.उमादेवी शिवकुमार सिरगिरे या दाम्पत्यांच्या हस्ते वास्तु पूजन करण्यात आले. पौरोहित्य सौ. मधुमती प्रा. नरेंद्र शिंदे यांनी केले.

आ. बनसोडे यांनी पतंजली योग समितीने केलेल्या मागणीचा सन्मान करून योग भवनसाठी दोन कोटी रुपये देण्याचे घोषणा केली.तसेच पतंजली योग समिती व रामदेवजी बाबा यांच्या कार्याचे भरभरून कौतुक त्यांनी केले. निस्वार्थ भावनेने पतंजली योग समिती काम करत आहे. अशा शब्दात पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. ना. भगवंतजी खुब्बा यांनी पतंजलीच्या कार्याचे कौतुक केले. त्याचबरोबर देशभरात व जगभरात नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबा यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे, आणि त्यांचाच वारसा पतंजली योग समिती चालवत आहे. याबद्दल पतंजली योग समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यां बद्दल त्यांनी गौरव उद्गगार काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज बिराजदार यांनी केले तर आभार अध्यक्ष सुरेंद्र आकनगीरे यांनी केले. याप्रसंगी महामंत्री प्रा. श्रीराम चामले, कोषाध्यक्ष शिवकुमार शिरगिरे, उपाध्यक्ष सुहास केंद्रे. बळवंत कुलकर्णी,दिलीप दमकोंडवार गोविंदराव कोटगीरे, भारत स्वाभिमानचे अध्यक्ष प्राचार्य वीरभद्र कपीकेरे, युवा प्रभारी प्रा श्रीकांत स्वामी, शिवलिंग मठपती, महादेव खताळ, हनुमंत शेळके, बालाजी गुरुमे , नारायणराव पाटील, नारायण वाकुडे, सुबोध आंबेसंगे, मीनाक्षीताई स्वामी, राम घाडगे ,रोडगे नरेंद्र शिंदे ,स्मिता पोद्दार ,सविता यंदे ,कल्पना गिरी,ॲड.अश्विनी कुलकर्णी ,अर्चना चिकटवार, कलावती भातांब्रे नारायण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author