एकत्रित कुटूंबामुळे संस्कार आणि संस्कृतीचे संवर्धन होते – सद्गुरु सदानंद स्वामी महाराज
लातूर (एल .पी.उगीले): एकत्रित कुटूंबामुळे आपल्या भावीपिढ्यांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचे संवर्धन होते. तसेच त्यामुळे देश, राज्य, जिल्हा, गाव आणि कुटूंब यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान व आस्था निर्माण होते. तसेच संयुक्त कुटूंबपध्दतीमुळे देशातील वृध्दाश्रमांची संख्या कमी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास श्री क्षेत्र रामलिंगेश्वर महाराज संजीवन समाधी मठ संस्थानचे पाचवे मठाधिपती सद्गुरु सदानंद स्वामी महाराज यांनी व्यक्त केला.
सद्गुरु सदानंद स्वामी महाराज हे लातूर तालुक्यातील पाखरसांगवी परिसराच्या राजे शिवाजी नगर भागात रामेश्वरजी भैय्या धुमाळ युवा प्रतिष्ठान व श्री सद्गुरू सदानंद स्वामी महाराज सेवा समिती लातूरच्या वतीने आयोजित केलेल्या धुमाळ कुटूंबियांच्या दिक्षा समारंभ व सत्संग सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना आशीर्वचन देत होते.
यासमारोहाच्या सुरुवातीला सद्गुरु सदानंद स्वामी महाराज यांनी धुमाळ कुटूंबियांसह उपस्थित अन्य शिष्यांना गुरुदिक्षा देऊन त्यांना कानमंत्र दिला. त्यानंतर गुरुदिक्षे संबंधी विस्तृत माहिती देऊन गुरु आणि शिष्याच्या नात्यातील पावित्र्य त्यांनी समजून सांगितले. याप्रसंगी श्री क्षेत्र रामलिंगेश्वर महाराज संजीवन समाधी मठ संस्थांचे उत्तर अधिकारी ओमकार महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाराजांनी आपल्या आशीर्वाचनात सांगितले की, देवापेक्षा ही कुटूंबातील थोरा मोठ्यांची व आई वडीलांची सेवा करा. त्यांच्यातच खरा ईश्वर दडलेला आहे. तसेच एकत्र कुटूंबपध्दतीमुळे घरात असणार्या थोरामोठ्यांकडून घरातील सर्व लहान बालकांना, घरातील सर्व ज्येष्ठांचा आदर करण्याचे संस्कार दिले जातात. संयुक्त कुटूंब व्यवस्थेमुळे आपल्या भावी पिढ्यांकडून वृध्दाश्रमांबद्दल आकर्षण वाढण्या ऐवजी आपल्या परिवारातील ज्येष्ठ नागरिकांबद्दल आणि आई वडीलांबद्दल प्रेम, आस्था निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारातील सदाचारात एकत्र कुटूंबाबद्दलची भावना वृध्दींगत करुन आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा तिरस्कार मनातून काढून टाकावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच विज्ञान युगात वावरणार्या नवयुवकांना किंवा आजच्या पिढीतील नागरिकांना सुध्दा काही वर्षांनी वृध्दावस्था येणार आहे. अशा वेळी जर तुमच्या पाल्यांनी तुम्हाला वृध्दाश्रमाचा पर्याय निवडला तर तुम्हाला काय वाटेल ? याचा देखील विचार करावा. तसेच आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा ही अगदी दारातील श्वानापासून अनेक पाळीव पशुपक्षांना सुध्दा आपलेसे करुन वागवणारी आहे. आपल्या घरातील आपले आई, वडील, आजी- आजोबा हे देखील आपल्या परिवाराचे अविभाज्य घटक समजून त्यांचा आदर करावा. असा आग्रह ही त्यांनी यावेळी उपस्थित भाविक भक्तांना केला.
त्याशिवाय आपण सर्वांनी देव, देश आणि धर्मा बरोबरच घरातील सर्व व्यक्तिंना महत्व प्रदान करावे. तसेच एकत्र कुटूंबातील प्रत्येक सदस्यसबद्दल आदर, मान- सन्मान जोपासला पाहिजे यामुळे आपला गाव, जिल्हा, राजय आणि देश हे अखंड राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी पाखरसांगवी, लातूर, औसा, उस्मानाबाद, नांदेडसह परिसरातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
तत्पूर्वी सद्गुरुंचे यथोचित स्वागत रामेश्वरजी धुमाळ यांनी परिवाराच्या वतीने केले. आशिर्वचना नंतर सद्गुरु सदानंद स्वामी महाराजांच्या हस्ते औसा येथील दुय्यम निबंधक (रजीस्टार) श्रीनिवास उर्फ विशाल जगदाळे यांचा सन्मान धुमाळ कुटूंबियांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार संतोष स्वामी, लहू शिंदे यांनी केले.
चौकट ः
जीवनात सन्मार्ग दाखवणारे गुरु हे दिशा दर्शक असतात- रामेश्वरजी धुमाळ
आपण कितीही शिक्षीत, विद्याविभुषीत असलो तरी कोणतेही ध्येय्य साध्य करण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते. तो मार्गदर्शक घटक म्हणजेच गुरु होय. आपल्या जीवनात सदाचाराने प्रपंच करुन परमार्थ करावा अशी शिकवण देणारे गुरु हेच खरे दिशा दर्शक असतात सद्गुरु सदानंद स्वामी महाराज हे आमचे गुरु असल्याचा आम्हा धुमाळ कुटुंबीयांना अभिमान वाटतो असे मत श्री रामेश्वरजी धुमाळ यांनी आभार प्रदर्शना प्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी कार्यक्रमास पाखरसांगवीचे लोकनियुक्त सरपंच भीमाशंकर ओर राजाभाऊ लखादेवे माजी सरपंच शिवदास लखादिवे माजी उपसरपंच खाजाभाई पठाण माजी उपसरपंच साहेबराव देशमुख किसनराव लखादिवे भागवत वाघमारे माजी उपसरपंच सिताराम वाघमारे पोस्टमास्टर सखाराम वाघमारे तंटामुक्ती समिती अध्यक्ष भागवत शिंगण ग्रामसेवक विठ्ठल चोथवे माजी सरपंच सुनीता शिंगण राजकुमार सिंगम ग्रामपंचायत सदस्य जावेद पठाण अश्फाक शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती
कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी गिरजाकांत वैरागकर दिगंबर कलमे दयानंद कारंजे रामेश्वरजी भैया धुमाळ युवा प्रतिष्ठानचे चंद्रकांत धुमाळ महेश गायकवाड पत्रकार नितीन पडले सचिन सूर्यवंशी प्रथमेश गोताळकर संतोष साखरे शंकर बचाटे करण शिंदे पाटील सुनील फुलारी अनिल सोमवंशी बळीराम यादव महेश क्षीरसागर विलास हडपद प्रभुलिंग लखादिवे शशिकांत फुलगामे विष्णू धुमाळ रत्नाकर धुमाळ धनंजय राऊत टाकले आदी मंडळींनी परिश्रम घेतले