शेतकरी उत्पादक कंपनी कडून सोयाबीन बियाण्याचे वाटप
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे दावणगाव येथील बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प “स्मार्ट” योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तीस सोयाबीन बॅगचे वाटप तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, शिवाजीराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोजे दावणगाव तालुका उदगीर येथे l कंपनीच्या सभासदांचा शेतकरी मेळावा व प्रशिक्षण तसेच बियाणे वाटप कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनील देवनाळे, मंडळ कृषी अधिकारी देवर्जन हे होते. तर प्रमुख उपस्थितीत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा नितीन दुरुगकर, कृषी सहाय्यक दावणगाव प्रशांत गायकवाड, कृषी सहाय्यक हनुमंत म्हेत्रे, कंपनी संचालक आनंद जाधव जकनाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन दुरुगकर यांनी करताना कार्यक्रमाचे स्वरूप, स्मार्ट शेती शाळेचे महत्त्व व त्याचे वर्ग व त्याचाच भाग म्हणून बियाण्याचे वाटप करून बीजप्रक्रिया करूनच बियाणे पेरावे, असे आवाहन केले. बीज प्रात्यक्षिक ही करून दाखवण्यात आले. हनुमंत मेत्रे कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन करताना खरीप हंगामात पिकाच्या लागवडी विषयी घेण्यात येणाऱ्या काळजी व निगा विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. सोयाबीन बियाणे बीबीएफ पद्धतीने पेरावे व ज्यांना शक्य असेल त्यांनी टोकन पद्धतीने सोयाबीन पेरून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. अध्यक्षीय भाषण करताना सुनील देवनाळे यांनी सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे गोगलगाय नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खोल नांगरटी करणे, गुळाच्या गोणपाट पद्धतीने नियंत्रण करणे, तसेच रासायनिक नियंत्रणामध्ये स्नेल किल या औषधाचे वापरण्याची योग्य पद्धत, याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी विचारल्याप्रमाणे तूर उधळु नये म्हणून त्याला पर्याय म्हणून बियाणे बदलणे येतात. क्षेत्रावर तूरवर तूर न घेणे, बीज प्रक्रिया करून तूर लागवड करणे, व तूर 45 दिवसाची झाल्यावर त्याला ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकांची ड्रेनन्चिंग करणे, असे बरेच पर्याय शेतकऱ्यांना सांगितले. व एकरी सतरा क्विंटल विक्रमी उत्पादन काढणाऱ्या रावणगाव येथील शेतकरी भीमराव डोनगापुरे यांचे उदाहरण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सविस्तर अशी चर्चा करून समाधान केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीपान अंधारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक दावणगाव प्रशांत गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास परिसरातील सर्व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.