पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सामान्य जनतेला न्याय दिला.खासदार सुधाकर श्रृगांरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सामान्य जनतेला न्याय दिला.खासदार सुधाकर श्रृगांरे

अहमदपूर ( गोविंद काळे ) : भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व सामान्य जनतेला केंद्र बिंदु समजून विकासात्मक अनेक योजना राबवून न्याय दिला असल्याचे प्रतिपादन खासदार सुधाकर श्रृगांरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
अहमदपूर येथील शासकीय विश्राम गृहावर मोदी @ 9 महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत
पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधानाची सुत्र हाती घेऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महा जनसंपर्क अभियान 30 में ते 30 जून या काळात राबविले जात असून या अभियानाचा एक भाग म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 24 जुन रोज शनिवारी लातूर जिल्ह्यचे अभियानाचे प्रमुख खासदार सुधाकरजी श्रृगांरे , अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार परिषदेत खासदार सुधाकर श्रृगांरे व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या नऊ वर्षात सर्व घटकांना न्याय दिला असून,मागेल त्याला घरकुल,मोफत अन्न धान्य,मोफत कोविडची लस, मोफत आरोग्य सुविधा ,रस्ते ,पिण्याचे पाणी,शेतीसाठी पाणी अशा अनेक योजना सर्व सामान्य जनतेसाठी राबविल्या आहेत. आहेत.अन्न ,वस्त्र ,निवारा या मुलभूत गरजा पुरवल्या असून अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन जगामध्ये भारताचा बाविसाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकाचा देश म्हणून ओळख करून दिली आसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत खासदार सुधाकर श्रृगांरे व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सांगितले
यावेळी माजी नगराध्यक्ष भारत चामे ,भाजपाच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर,प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे, कमलाकर पाटील ,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी,रामभाऊ बेल्लाळे डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,अमित रेड्डी,निळकंठ पाटील,सौ.मंगलताई गुट्टे,शिवराज पाटील,सुधिर गोरटे,बालाजी गुट्टे,सुहास सोनकांबळे,बालाजी पडोळे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

About The Author