२३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन परिसर सुजलाम सुफलाम होणार : आ.बाबासाहेब पाटील

२३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन परिसर सुजलाम सुफलाम होणार : आ.बाबासाहेब पाटील

२५ कोटी रुपयांच्या निधीतून उर्ध्व मानार उपसा सिंचन योजना डावा कालवा व उजवा कालव्याचे अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन

अहमदपूर( गोविंद काळे )मौजे सुमठाणा येथे उर्ध्व मानार उपसा सिंचन योजना ता.अहमदपूर येथील डावा कालवा व उजवा कालव्याचे सिमेंट क्रॉक्रेटने अस्तरीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.पाटील यांनी उपस्थित राहून विकासकामाचे भूमिपूजन करत ग्रामस्थांशी संवाद साधला.

प्रसंगी आमदार पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीतून या कालव्याचे अस्तरीकरण होणार आहे. या योजनेमुळे ३ हजार हेक्टर पैकी २ हजार ३०० हेक्टर हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शेतकरी बांधवांबरोबरच परिसरातील सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फायदा होईल. अहमदपूर चाकूर मतदारसंघाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील आहे. विकासाच्या मार्गावर चालून सर्वसामान्य जनतेची सेवा करत आहोत याचा विशेष आनंद आहे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वे.शा.सं गुरुवर्य बापदेव महाराज बेलगावकर महाराज, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सांबजी महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी दादा रेड्डी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंचकरावजी पाटील, कार्यकारी अभियंता चिस्ती साहेब, काळे जी, उपसभापती संजयजी पवार, माजी सभापती ऍड.टी.एन कांबळे, माजी सभापती संचालक चंद्रकांत जी मदे, माजी जि.प सदस्य माधवराव जाधव, माजी सभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर, सिद्धी शुगर व्हॉइस प्रेसिडेंट पी.जी होनराव, शेतकी अधिकारी पी.एल मिटकर, टाळे, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, संचालक रामदासजी कदम, संचालक किशनजी पाटील, संचालक यशवंतराव केंद्रे, संचालक शिवजीराव पाटील, संचालक प्रतिनिधी नारायण नागमोडे, युवक जि.कार्यध्यक्ष प्रशांतजी भोसले, अविनाशभैय्या देशमुख, जिल्हा सरचिटणीस इमरोजजी पटवेगर, जिल्हा चिटणीस गोपीनाथ जोंधळे, माजी न.पा गटनेते डॉ.फुजल जहागिरदार, संचालक ऍड सादिक शेख, प्रकाशजी ससाणे, माजी नगरसेवक भैयाभाई सयद, युवक ता.अध्यक्ष दयानंदजी पाटील, अशोकराव सोनकांबळे, फेरोज शेख, सय्यद इलियास, तानाजी राजे, आशिषजी तोगरे, अनिलराव बेंबडे, सुमठाणा सरपंच गंगाराम पोले, खंडाळी सरपंच अशोकराव मोरे, नागेशजी बेंबडे, संतोषजी कदम, अक्रम पठाण, खंडाळी उपसरपंच गिरीधरजी पौळ, मंगेशजी नागरगोजे, आरदवाड मामा, बेंबडे अभियंता, अनिलराव बेंबडे, संग्राम गायकवाड, चेअरमन उजना शिवशंकरजी आगलावे, गंगाहीपरगा चेअरमन सुभाषराव कदम, चांद मिस्त्री, मदनराव मुसळे, गणेश पोले, चेअरमन दिगंबर मामा पोले, दत्ता मुसळे, बळीराम जी पोले, विश्वनाथ पोले, नंदकुमार पोले, चंद्रहास पोले, भगवानराव पोले, बाळासाहेब मुसळे, प्रताप फाजगे,कार्तिक घाटीवाले सर, सुमठाणा, गंगा हिप्परगा, खंडाळी, काळेगाव, बेंबडेवाडी, वंजारवाडी, टाकळगाव, शेनकुड, उजना सह परिसरातील शेतकरी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

About The Author