महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्रा.डॉ.गव्हाणे यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताह अंतर्गत प्रा.डॉ.गव्हाणे कमलाकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ. एस.जी.पाटील होते. यावेळी बोलताना गव्हाणे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या महत्वाच्या सात बाबी विषयी माहिती दिली. त्याबरोबरच विद्यार्थी आता पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत असताना व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ज्ञान प्राप्त करतील ज्यामुळे नौकरी वर विसंबून राहणे कमी होईल. यावेळी “मला समजलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” ह्या विषयावर संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धेतील प्रथम विजेती दिव्या सतीश फत्तेपुरे, द्वितीय विजेती पाटील साक्षी उमाकांत आणि तृतीय भांजी प्रिया राजेश्वर यांना रोख रक्कम बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. समारोपात उपप्राचार्य पाटील यांनी शैक्षणिक धोरण शैक्षणिक विश्वात चांगले बदल घडवेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.बी.आलापुरे, सूत्रसंचलन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समितीप्रमुख प्रा.डॉ.बी.डी.करंडे यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार यांनी मांडले. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.