विद्यार्थ्यांनी तयार केली नाविन्यपूर्ण गणितीय उपकरणे

विद्यार्थ्यांनी तयार केली नाविन्यपूर्ण गणितीय उपकरणे

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे, गणितीय उपकरण निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे कार्यकारणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुने, बालवाडीच्या अध्यक्ष अंजलीताई नळगिरकर, धनराज बंडे, संस्था सदस्य गोविंदराव जामखंडे डॉ. संजय कुलकर्णी, मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. अतिशय नविण्यपूर्ण पद्धतीने, कल्पकतेने, सर्जनशीलतेने विद्यार्थ्यांनी तब्बल 75 गणितीय उपकरणे बनवली. यात पाचवी ते सातवी विभागात सर्वप्रथम प्रांजल भगवान पाटील, द्वितीय श्रुती नरर्सिंग बिरादार, तृतीय त्रिशा संदीप सोनटक्के तर उत्तेजनार्थ आनंदी विश्वनाथ स्वामी यांनी यश संपादन केले आहे. आठवी ते दहावी विभागात प्रथम संचिता उत्तम नादरगे व त्रिवेणी संभाजी पाटील, द्वितीय गायत्री नामदेव गुरमे व संस्कृती नामदेव गुरमे, तृतीय श्रीया गुरुदत्त महामुनी व शरण्या संजय वनशेट्टे यांनी यश संपादन केले.या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले, पर्यवेक्षक तथा गणित प्रमुख कृष्णा मारावार, गणित प्रमुख तथा परीक्षक नीता मोरे,रामेश्वर मलशेट्टे स्पर्धा प्रमुख बाळासाहेब खोडवे,दिलीप पाटील, सहाय्यक आशा मोरे, पंकज देशमुख, नेटके यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

About The Author