सातबारावर चुकीचा फेर घेणाऱ्या तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर कारवाई करा – मागणी
उदगीर (प्रतिनिधी) मौजे हकनकवाडी तालुका उदगीर येथील सर्वे नंबर 62/4 मध्ये चुकीचा फेरफार करणाऱ्या तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाईच्या युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
मौजे हकनकवाडी तालुका उदगीर येथील सर्वे नंबर 62/4 मध्ये 2025- 2016 पर्यन्त नांदेड बिदर रस्ता हा माधव बनाजी केंद्रे यांच्या जमिनीतून गेला आहे. 01/12/1977 च्या खरेदीखतानुसार घेण्यात आलेली होती, पण इसवी सन 2015 -2016 मध्ये तत्कालीन तलाठी मंडळ अधिकारी यांनी लाखो रुपये घेऊन सदरील रस्त्याची नोंदणी घेतली आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. 2011 पर्यंत जी सातबारावर रस्त्याची नोंद होती, त्याप्रमाणे नोंद घ्यावी व चुकीचा फेरफार करणाऱ्या तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) युवक आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, नितीन गायकवाड, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष मनोज माणसे, नरेश चांदे, दवनाथ त्रिमूखे, विपुल कोल्हे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाची दखल नाही घेतल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.