उदयगिरीत आंतर -विभागीय बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा संपन्न

उदयगिरीत आंतर -विभागीय बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर – विभागीय बॅडमिंटन व टेबल टेनिस (पुरुष व महिला) स्पर्धा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इनडोअर स्टेडियम मध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अ,ब,क,ड विभागातून बॅडमिंटन व टेबल टेनिस पुरुष व महिलांचे 16 संघानुसार 80 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. याचबरोबर संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व पंच म्हणून 50 व्यक्तींनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, स्पर्धेचे उद्घाटक व विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.मनोज रेड्डी, प्रमुख पाहुणे डॉ.प्रदीप देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी व ॲड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव ॲड.एस.टी.पाटील व डॉ.आर.एन.लखोटिया, सदस्य प्रशांत पेन्सलवार, बसवराज पाटील मलकापूरकर, विद्यापीठ अधीसभा सदस्य प्रा. डॉ महेश बेंबडे, ‘ब’-विभाग सचिव डॉ.भास्कर माने, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, क्रीडा संचालक प्रा.सतिश मुंढे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.मनोज रेड्डी यांनी खेळाचे महत्व व भविष्यातील संधी आणि पुढील होणाऱ्या विविध स्पर्धेबाबत माहिती दिली.

डॉ.प्रदीप देशमुख यांनी खेळाडूंना खेळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान याबाबत माहिती सांगून खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखावी, हे सांगतानाच त्यांनी प्राचीन काळापासून खेळाचे महत्व सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले, खेळातूनच भारताचे भविष्य घडेल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळावर भर द्यावा. बॅडमिंटन व टेबल टेनिस विद्यापीठ निवड समिती अध्यक्ष, सदस्य व पंच म्हणून प्रा.डॉ.भास्कर रेड्डी, डॉ.अश्विन बोरीकर, डॉ.महेश वाकरडकर, डॉ.अशोक वाघमारे, डॉ.राजेंद्र तुप्पेकर, डॉ.दिलीप भडके यांनी आपली भूमिका बजावून कामे पार पाडली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.रोहन ऐनाडले, प्रा.निहाल खान, डॉ.सचिन चामले यांनी कामे पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ.मल्लेश झुंगास्वामी व आभार क्रीडा संचालक प्रा.सतिश मुंढे यांनी केले.

About The Author