विभागीय कराटे स्पर्धेमध्ये ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोशियशन यांच्याद्वारे आयोजित विभागीय कराटे स्पर्धेमध्ये लातूर विभागातील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यामध्ये एकूण सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, दोन विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल व चार विद्यार्थ्यांनी ब्रांझ मेडल मिळवले. व घवघवीत यश संपादन केले. वयोगट 10 वर्ष मध्ये समर्थ काळे गोल्ड मेडल,सुमित शेळके 16 वर्षे वयोगट गोल्ड मेडल, अभिराज लाडाने 11 वर्षे वयोगट गोल्ड मेडल, सक्षम बोकरे 14 वर्षे वयोगट गोल्ड मेडल, हरी ओम दीक्षित 12 वर्षे वयोगट गोल्ड मेडल, यशराज भोसले 11 वर्षे वयोगट गोल्ड मेडल, सुकन्या सूर्यवंशी 16 वर्षे वयोगट गोल्ड मेडल, भक्ती जाधव 12वर्षे वयोगट सिल्वर मेडल,पवन साळुंखे, शिवरुद्र गौरशेट्टी,सूर्या परभाते, राजवीर कटाले ब्राँझ मेडल या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्धीला हरवत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बिरादार, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुजित बिरादार, प्राचार्य आम्रपाली सरवदे, सीईओ रामेश्वर सगरे सर्वांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंना विशाल कांबळे, विठ्ठल गुरमे व कराटे शिक्षक प्रसाद माळी यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले.