अप्पासाहेब कदम यांचा वाढदिवस साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणाची आवड असणारे अप्पासाहेब देविदास कदम यांचा 76 वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. हा कौटुंबिक सोहळा मौजे बनवस या ठिकाणी पार पडला. सहशिक्षक सूर्यकांत बापूराव कदम व त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा सूर्यकांत कदम यांच्या वतीने हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अप्पासाहेब यांचे सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये पूर्वीपासून मोठे योगदान राहिलेले आहे. चळवळ त्यांच्या अंगी रुजलेली असल्यामुळे त्या काळामध्ये छोटे कुटुंब, सुखी कुटुंब अशा पद्धतीने त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी हे अपत्य आहेत. दोघांनाही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. शेती करून आपल्या मुलाला एम. ए. बी. एड, नेट , पी.एच.डी. पर्यंत शिक्षण देऊन त्यांना उच्चशिक्षित केले. तर जावई शिक्षणाचे माहेरघर पुणे येथे कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या या शिक्षणाच्या आवडीमुळे आज एक नातू इंजिनियर आहे, व त्यांचे दोन नातू आणि एक नात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होत आहेत. बनवस येथील जिल्हा परिषदेची शाळा शंभर टक्के निकाल लागणारी असल्यामुळे नात्यातील अनेक मुले बनवसच्या शाळेत शिकू इच्छित होते. त्या मुलांना आपल्या घरी ठेवून शिक्षण देण्याची संधीही त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांना नोकरीही मिळालेली आहे. आपल्याला इतरांसाठी जे चांगलं करता येईल ते करत राहावं. हा त्यांचा पूर्वीपासून बाणा राहिलेला आहे. यासोबतच आरोग्य ही धनसंपदा आहे. या उक्तीप्रमाणे त्यांनी नियमित फिरणे आणि व्यायाम करणे याचे सातत्य राखलेले आहे. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे मित्र पत्रकार अंबादास आलमखाने, त्यांचे बंधू गिरीश कदम व त्यांची सून सुनिता भास्कर कदम, मुलगा प्रा.डॉ. कदम नरसिंग ,सून गोदावरी नरसिंग कदम, आशिष कदम, सुशील घाडगे आदींची उपस्थिती होती.