वसंत शिरसे यांच्या विधानसभा संयोजकपदी निवडी निमित्त सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाशी एक निष्ठ राहिलेले सच्चे कार्यकर्ते व माजी आ.सुधाकर भालेराव यांचे खांदे समर्थक वसंत शिरसे यांची दोन वेळेस भाजपा उदगीर तालुकाध्यक्ष व संगायोच्या चेअरमनपदी नियुक्ती केली. वरीष्ठ नेत्यांसह ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली असून त्यांच्या दोन्ही कार्यकाळात प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळउन देण्याचे काम केले. पक्ष बांधणी व निवडणूक रणणीती ते चोख पध्दतीने बांधून नगर परिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्राम पंचायत असो की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत त्यांनी सक्रियतेने काम करून संघटन कौशल्याची धमक दाखवली. माजी सुधाकर भालेराव यांच्यावर 2019 मध्ये अन्याय झाला तेंव्हा पक्षश्रेष्ठनींकडे उदगीर विधानसभेच्या नुकसानी बाबत प्रखड मत मांडले यामुळे जेष्ठ नेत्यांपासून ते ग्रामीण भागातील छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता व मतदारांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे.यामुळे सध्या चालू असलेल्या महायुती सरकारमध्येसुध्दा उदगीर मतदारसंघातील गटबाजी दूर करण्यासाठी व कार्यकर्त्यांना एकत्र बांधून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पुन्हा बहुमताने भाजपाचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांची उदगीर विधानसभा संयोजकपदी माजी आ.सुधाकर भालेराव यांच्या हस्ते निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यामुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा भाजपाला उभारी देतील, अशी सर्वत्र चर्चा आहे.https://policeflashnews.com/?p=40433
त्यांच्या निवडीनिमित्त उदगीर शहर भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे,माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,शहराध्यक्ष मनोज दादा पुदाले,उदगीर शहर संघटन सरटिचणीस आनंद बुंदे, उदगीर तालुका सरचिटणीस संतोष कुलकर्णी,राम जाधव,आनंद साबणे आदी उपस्थित होते. याच सोबत माजी आ.सुधाकर भालेराव यांच्या निवासस्थानी संग्राम निवास येथे ग्राम पंचायत सदस्या तथा भाजपा उदगीर तालुका उपाध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांनी सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उदगीर तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन माने, वॉर रूम मॅनेजर तथा सोशल मिडिया सहसंयोजक महादेव घोणे उपस्थित होते.