सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व उदगीर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती रॅली
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या निवडणूक निर्णय अधकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाने लातूर जिल्ह्यामध्ये दिनांक ७ मे २०२४ रोजी लोकसभेचे मतदान होणार असून या अनुषंगाने दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वा. उदगीर शहरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकशाहीच्या या महोत्सवात सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी “बाई पण भारी देवा” म्हणत सदर रॅली मध्ये महिलांचा सहभाग होता. यात महिला बचत गटाचे सदस्य, आशा वर्कर, आरोग्य सेविका, न. प. कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
रॅलीच्या सुरुवातीस उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिका प्रशासक सुशांत शिंदे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर ,गट विकास अधिकारी प्रविण सुरडकर यांनी उपस्थित महिलांना लोकशाहीच्या या उत्साहात सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन केले. सदरील मतदान जनजागृती अभियानाच्या
रॅलीचा मार्ग न. प. कार्यालय ते उमा चौक ते मुक्कावार चौक ते आर्य समाज ते चौबारा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यामार्गे समारोप न प कार्यालया समोर करण्यात आला.
सदर रॅलीच्या यशस्वीेतेसाठी मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, संकीर्ण, अतिक्रमण, स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.