डॉ. नीलमताई गोरे व शिवाजी माने यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोरे व जिल्हाप्रमुख शिवाजी माने हे उदगीर दौऱ्यावर आले असता, त्यांचा सत्कार करून, शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, माजी शहर प्रमुख अनिल पंचाक्षरी, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अरुणा ताई लेंडाणे , ऍड. रामदास काकडे,ओम ददापुरे, ऍड. शरद पाटील, श्याम तवर, प्रदीप पाटील, किरण कांबळे, श्यामद पठाण, मनोज निवडगे, चंद्रकांत बिरले, वैशाली गोटमुकले, सरोजा बिरादार, आदी शिवसैनिक उपस्थित होते.