परीक्षेत घवघवीत यश मिळविल्या बद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील मौजे गुरधाळ येथील नृसिंह विद्यालयातील एन.एम.एम.एस परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेऊन सन्मान केला आहे. या शाळेचा 100 टक्के निकाल लागला आसुन, 14 पैकी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. व 8 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृती मिळवणारे विद्यार्थी कु.कृष्णाई संजिव पेठे,कु.जानवी मचिंद्र पेठे,वाघमारे भीम दिलीप, गायकवाड शुभम माधव,
छत्रपती राजाराम महाराज तसेच सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी
वार्षिक 9000 रुपये मिरकले हर्षद हनमंत, बिरादार कृष्णा मनोज, कु. मुराळे श्रध्दा ज्ञानोबा,घोगरे श्रीहरी सुग्रीव या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने व शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ.सोमवंशी के.आर.यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांचे वर्ग शिक्षक येवरे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील होनराव, पाटील बी.एम.,बिरादार , पाटील आर.के., जगतात,श्रीमती भांगे, गोरे, गायकवाड ,राठोड, धनासुरे या शिक्षक वृंदासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.