लातूर (एल पी उगीले) पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करून आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली रोख रक्कम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे.
रेणापूर पोलीस ठाणे हद्दीत दाखल जनावर चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली रोख रक्कम आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
त्यानंतर रेणापूर पोलीस ठाणे येथे दाखल ७ गुन्ह्यांतील एकूण ८,१५,०००/- इतकी रोख रक्कम संबंधित शेतकरी फिर्यादींना बंदपत्र घेऊन परत करण्यात आली,
यामध्ये गु.र.क्र. ४००/२०२६ मधील शिवाजी मारुती शिरसाट यांना १,२०,०००/- तसेच गु.र.क्र. ३९/२०२६ मधील संतोष तुकाराम जोगदंड यांना १,००,०००/- आणि गु.र.क्र. ५५/२०२६ मधील शेख फारूक सरदार यांना १,६०,०००/-देण्यात आले. गु.र.क्र. १७०/२०२६ मधील धोंडीराम दत्तू भिसे यांना १,२०,०००/-रुपये,गु.र.क्र. १८९/२०२६ मधील हरिराम शंकरराव बाणापुरे यांना १,७०,०००/- रुपये,
गु.र.क्र. २०९/२०२६ मधील शालिवाहन लक्ष्मण राऊतराव यांना ६५,०००/- रुपये,गु.र.क्र. ३९६/२०२६ मधील रामगोविंद गुंडले यांना ८०,०००/- अशी रक्कम परत करण्यात आली.
तसेच गु.र.क्र. १७३/२०२६ मधील फिर्यादी वैयक्तिक अडचणीमुळे उपस्थित राहू न शकल्याने सदर गुन्ह्यातील २,१०,०००/- रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यात आली आहे. संबंधित फिर्यादी पोलीस ठाण्यात उपस्थित होताच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर रक्कम त्यांना परत करण्यात येणार आहे.
जनावर चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्यासोबतच, चोरीस गेलेली व आरोपींकडून हस्तगत झालेली मालमत्ता संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याच्या कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून जनावर चोरीसह मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे.













Responses (0 )