Police Flash News

छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचा खो खो महिलांचा संघ उपविजयी

0
1
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचा खो खो महिलांचा संघ उपविजयी

उदगीर (प्रतिनिधी) हडोळती येथे संपन्न झालेल्या 'ब' विभागीय आंतर महाविद्यालयीन खो खो महिलांच्या स्पर्धेत छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचा महिलाच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकावला. संघाची कर्णधार अमगे प्रगती च्या नेतृत्वात संघाने आपली कामगीरी पार पाडली. संघात प्रचिती, जाधव गायत्री, बिरादार सुकन्या, किसवे वैष्णवी, अढाव रेणुका, सूर्यवंशी महादेवी, खराबे कोमल, शेख अनिसा अलीम, शेख इशाद नवाज, माने वैष्णवी, पाटील वैष्णवी श्रीकांत, गायकवाड सोनाली, बिरादार पल्लवी, ढगे नंदिनी विलास यांचा समावेश होता. या खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर कु.अमगे प्रगती, कु.मुळे प्रचिती, कु. बिरादार सुकन्या, किसवे वैष्णवी दत्तात्रय, जाधव गायत्री या खेळाडूची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली. खेळ आणि खेळाडूसाठी प्रसिध्द असलेले या महाविद्यालयातून अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले. ही परंपरा कायम ठेवत खेळाडू आपली यशाची उज्ज्वल कामगिरी करत आहेत.

खेळाडूंच्या या यशाबद्दल खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील व कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे, पर्यवेक्षक प्रा.राम गिरी, शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. नेहाल खान व प्रा.गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts