Police Flash News

गैरवर्तन झाले असेल तर घाबरू नका, निःसंकोचपणे पुढे या,आदर्श इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अन्य विद्यार्थिनींवरही अशा प्रकारचे गैरवर्तन झाले असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

0
23
गैरवर्तन झाले असेल तर घाबरू नका, निःसंकोचपणे पुढे या,आदर्श इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अन्य विद्यार्थिनींवरही अशा प्रकारचे गैरवर्तन झाले असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर (एल पी उगीले) येथील

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७६, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी बशीर उस्मान शेख, आदर्श इंटरनॅशनल स्कूलचा संस्थापक, याला लातूर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, संबंधित आरोपीकडून अन्य कोणत्याही अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अशा प्रकारचे गैरवर्तन झाले असल्यास त्यांनी भीती न बाळगता पुढे यावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

महिला पोलीस उपअधीक्षकांशी थेट संपर्क साधा*

या प्रकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी विद्यार्थिनी किंवा त्यांच्या पालकांनी महिला पोलीस उपअधीक्षक डॉ. भागीरथी पवार यांच्याशी त्यांच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर (8766984651) संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याची, तिच्या सन्मानाची व सुरक्षिततेची काळजी घेण्याची आणि प्राप्त माहितीच्या आधारे कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची भूमिका लातूर पोलिसांनी स्पष्ट केली आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts