Police Flash News

समर्थ विद्यालयाचे खेळाडू मैदानी स्पर्धेत विभागस्तरावर.

0
36
समर्थ विद्यालयाचे खेळाडू मैदानी स्पर्धेत विभागस्तरावर.

उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय वैयक्तिक मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. माधव मुंडे हा खेळाडू ८०० व १५०० मीटर धावणे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आल्याने तो विभागीय स्तरावर खेळणार आहे.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धे माधव मुंडे याने आपल्या दमदार कामगिरीची छाप पाडत ८०० मीटर व १५०० मीटर धावणे या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. ४×४०० मीटर रिले स्पर्धेत समर्थ विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेत पात्र ठरला आहे. विजयी संघात विठ्ठल पेठे, शंकर ऐलवाड, माधव मुंडे, गणेश घटकार व प्रज्वल हलगे या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावली. या यशाबद्दल विजयी खेळाडू व क्रीडा समन्वयक किरण हाळीघोंगडे यांचे संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, सहसचिव प्रणयन चौधरी, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्थासदस्य एम. व्ही. स्वामी, प्रयास चौधरी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts