लातूर (एल पी उगीले) शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या लोखंडी कत्ती बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध विवेकानंद चौक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत कृष्णा ऊर्फ पप्पू सुभाष आडे (वय २५ वर्षे, रा. हारंगुळ खुर्द, ता. जि. लातूर) याच्याकडून लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३२/२०२६ अन्वये, व शस्त्र अधिनियम कलम ४, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता एलआयसी कॉलनीतील रस्त्यावर संबंधित तरुण सार्वजनिक ठिकाणी लोकांना धोका निर्माण होईल अशा स्थितीत लोखंडी कत्ती बाळगताना आढळून आला पोलिसांनी त्याच्याकडून लाकडी मूठ असलेली लोखंडी कत्ती जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन राठोड यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार ढगे करीत आहेत.














Responses (0 )