उदगीर (एल पी उगीले) महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ पडला आहे. शासनाने दुष्काळ ही जाहीर केला आहे. पण या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आपण स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून शासकीय परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, उदगीर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यावर दुजाभाव होणार नाही. अशी खात्री विधान परिषदेच्या आमदार तथा शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोर्हे यांनी माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्याशी बोलताना दिली. तसेच शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी ही त्यांनी जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भागातील चारा, पाणी टंचाई यांचा आढावा घेऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्या सोबत त्यांनी संवादही साधला.
याप्रसंगी शिवसेनेचे लातूर जिल्हा संघटक तथा माजी आमदार सुधाकरराव भालेराव, शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे, रंजनाताई कुलकर्णी महिला आघाडी संपर्कप्रमुख लातूर तसेच संपर्कप्रमुख सांगलीच्या सुनीता शिंदे, विधीज्ञ संगीता चव्हाण जालनाच्या शिवसेना संपर्कप्रमुख आणि लातूर जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदगीर तालुक्यातील सताळा पाटी, डिग्रस व करडखेलपाटी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडूनही निवेदने स्वीकारली. त्यांच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. दुष्काळ जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकर करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासन दरबारी दाखल करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व शेतकरी, शेतमजुरांसोबत सखोल संवाद साधला. तसेच दुष्काळ, पाणीटंचाई व चाऱ्याच्या प्रश्नाबाबत माजी आमदार सुधाकर भालेराव व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याप्रसंगी अनिल पंचाक्षरी, शिल्पा इंगळे, माधव टेपाले, मनोज पाटील, अमेर शेख, विलास राठोड, व्यंकट कसबे, सतीश कांबळे, रमाबाई वाघमारे, बाळू शिंदे, माधव पटवारी, प्रदीप मोरतळे, सुखदेव गुमनर, व्यंकट पटवारी, धना पाटील, मारुती गायकवाड, रवि कानपूर्णे, अतुल काकडे, देवा घंटे, शेरू शेख, विनोद तेलंगे, यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच श्रीकांत कोंपले, कुमार पाटील, बालाजी पडोळे, वाघम्बर तिरकले, उमेश सनगले, गजानन पांचाळ, पदमसिंह पाटील, मदन देशपांडे, प्रमोद देशपांडे, यशवंतराव पाटील, आरती सूर्यवंशी, कांता सूर्यवंशी, रामेश्वर ऊळागडे, वैजू जळकोटे, ओम बरदाळे, योगेश माने, लक्ष्मण मद्दे, राजेसाहेब पाटील, तुकाराम जाधव, हमीद शेख, शरद ढगे, मारुती इटेवार, सुशील पिटेवाड, एकनाथ कसबे, प्रकाश वाघमोडे, बालाजी रोडकर, रमाकांत होनाळे, वसंत होणाळे, कसबे विश्वराज, ओम कसबे, पांडुरंग ढगे, रघुनाथ ढगे, बापूराव माने, योगेश माने, बालाजी पुट्टेवाड, शांतिनाथ ढगे, श्रीमंत बिरगे, नागेश पाटील, मल्हारी बोईनवाड, पूजा पिंगळे, गुंजन पिंगळे, उषा नेत्रगावे, आरती सूर्यवंशी, अरुणा बेळकोने यांच्यासह प्रशासनातील अधिकारी यांनी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सविस्तर चर्चा करून अडीअडचणी समजून घेतल्या.
विम्याच्या संदर्भात उदगीर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गेल्यावर्षी अन्याय झाल्याचे माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी सांगितल्यानंतर आता उदगीर विधानसभा मतदारसंघावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. शासनाच्या वतीने मिळणारी मदत ही प्राधान्याने उदगीर विधानसभा मतदारसंघाला दिली जाईल. असे आश्वासनही याप्रसंगी नीलमताई गोर्हे यांनी दिली आहे.














Responses (0 )