Police Flash News

औसा येथील पी.एम. लॉजवरील अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

0
122
औसा येथील पी.एम. लॉजवरील अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील औसा येथे बनावट ग्राहकाच्या मदतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे, त्या कारवाईत २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,औसा येथील बालाजी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पी.एम. लॉजमध्ये महिलांना बोलावून त्यांच्याकडून अनैतिक व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर लातूर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नियोजनबद्ध छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तीन पुरुषांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४ व ५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, रोख रक्कम व तीन मोबाईल फोनसह एकूण २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला औसा येथील पी.एम. लॉजमध्ये महिलांना बोलावून अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांना माहिती देऊन, दोन पंच व बनावट ग्राहकाच्या मदतीने छाप्याचे नियोजन करण्यात आले. बनावट ग्राहक लॉजमध्ये गेल्यानंतर त्याने नियोजित संकेत दिला. त्यानंतर पोलीस पथकाने सायंकाळी सुमारे ५.२० वाजता लॉजवर छापा टाकला. तेथे बनावट ग्राहकासोबत एक महिला आढळून आली. तपासणीत मोबाईल फोन व कंडोमही जप्त करण्यात आले.

लॉजमध्ये महिलांना बोलावून अनैतिक व्यवसाय चालवणारे तीन आरोपी पुढीलप्रमाणे बालाजी प्रकाश कांबळे (वय ३१ वर्षे, रा. उटी, ता. औसा, जि. लातूर), महेश रामराव कांबळे (वय ३३ वर्षे, रा. सत्तरधरवाडी, ता. औसा, जि. लातूर; सध्या रा. याकतपूर रोड, औसा, ता. औसा, जि. लातूर), बापुराव व्यंकटराव वाघमारे (वय ५३ वर्षे, रा. मातोळा, ता. औसा, जि. लातूर)असे असून नमूद आरोपी हे महिलांना लॉजवर बोलावून ग्राहकांशी व्यवहार करून महिला कडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत १,५०० रुपये रोख रक्कम व मोबाईल तसेच कंडोम असे एकूण २३ हजार ५०० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशावर अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ पाटील, पोलीस अंमलदार लता गिरी, सुधामती वंगे, सदानंद योगी, सचिन मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts