Police Flash News

तिरु मध्यम प्रकल्पात वाढवणा व जनकल्याण मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने 5 लाख मत्स्य बिजाचे संचयण

0
1
तिरु मध्यम प्रकल्पात  वाढवणा व जनकल्याण मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने 5 लाख मत्स्य बिजाचे संचयण

उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्पावर स्थापन झालेल्या वाढवणा मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित वाढवणा बु. व जनकल्याण भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित वाढवणा ता. उदगीर या 2 संस्थेस सन 2024 ते 2029 या पाच वर्षाच्या कार्यकाळाकरिता समप्रमाणात मासेमारीसाठी शासनाकडून ठेक्याने मिळालेल्या तिरु मध्यम प्रकल्पात कतला, राहू, मिरगल, सुपर या जातींचे मत्स्य बोटुकली 2 इंच साईज चे 5 लाख मत्सबीज दि. 09-10-2026 रोजी संस्थेच्या पदाधिकारी, सभासद व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत तिरू मध्यम प्रकल्पात संचयन करण्यात आले.

सध्या तिरु तलावात 30 टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे, शासनाच्या उद्दिष्टा पेक्षा कमी प्रमाणात मत्स्य बीज सोडण्यात आले.

मत्सबीज संचयन केल्यामुळे यावर्षी अपेक्षित मत्स्य उत्पादन घेणे जरी शक्य नसले तरीही, संस्थेच्या सभासदांना कमी अधिक प्रमाणात का होईना रोजगार उपलब्ध होणार आहे.

यावेळी वाढवणा मत्स व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन मगदूम पठाण, सचिव रऊफ शेख, संस्थेचे सभासद उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts