लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची युती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणासोबतही नाही

लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची युती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणासोबतही नाही

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक – २०२३ या निवडणुकीत गेली सात वर्ष देशमुख अँड देशमुख कंपनीच्या ताब्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकरी नसलेल्या व्यक्तीच्या हातात बाजार समिती देऊन लातूर बाजार समितीचा काळा इतिहास लिहिला गेला. म्हणून शेतकरी हितासाठी मित्र पक्षांसोबत युती व्हावी म्हणून जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बालाजीराव काकडे व जिल्हाप्रमुख ॲड. बळवंतभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेण्यात आला परंतु मित्र पक्षाची वर्तणूक ही शेतकरी विरोधी दिसुन आली. काल परवा काँग्रेस पक्षात असलेले, काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले, त्यांना त्यांच्या पक्षात उमेदवारी नाकारली म्हणून भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देणे ही वर्तणूक शेतकरी विरोधी आहे. एकीकडे काँग्रेस विरोधात लढाण्याचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी द्यायची हे येथील भाजपाचे नेतृत्व शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. यामुळे शिवसेना शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी साखरसम्राट व शिक्षणसम्राट यांची तडजोडीची मतेदारी मोडून काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शिवसेना स्वतंत्र पॅनल उभा करत आहे. मित्र पक्षातील कोणीही बॅनरवर किंवा पोस्टरवर कुठेही शिवसेना या नावाचा व शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या फोटोचा किंवा नावाचा वापर करू नये. या जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या हितासाठी ही निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढवीत आहे. असे आवाहन लातूर जिल्हा संपर्कप्रमुख बालाजीराव काकडे व जिल्हाप्रमुख ॲड. बळवंतभाऊ जाधव यांनी केले आहे.

About The Author