अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी ३७ उमेदवार रिंगणात.
अहमदपूर( गोविंद काळे ) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून दि. २० एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६३ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले. निवडून द्यावयाच्या १८ जागेसाठी आता ३७ उमेदवार रिंगणात उतरले असून, एक अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १०० नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत सर्वच्या सर्व नामनिर्देशन पत्र वैध झाले होते. त्यामुळे १०० उमेदवारी दाखल झाल्या होत्या. परंतु दिनांक २० एप्रिल रोजी नाम निर्देशन पत्र परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६३ नामनिर्देशन पत्र परत घेतल्याने आता ३७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोसायटी सर्व साधारण मतदार संघातून ३८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. पैकी १४ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर २४ उमेदवारी अर्ज परत घेतले गेले. याच मतदारसंघातून आठ महिलांपैकी ४ उमेदवारी परत घेण्यात आल्या तर ४ रिंगणात आहेत. इतर मागासवर्ग मतदार संघातून २ निवडणुकीच्या रिंगणात असून ३ उमेदवारी परत घेण्यात आले आहेत. तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून ४ नामनिर्देशन पत्र परत घेतल्याने, २ निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून एकूण १५ उमेदवारी दाखल झाली होती. त्यापैकी ५ रिंगणात असून १० नामनिर्देशन पत्र परत घेण्यात आले. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून ६ उमेदवारी दाखल झाल्या होत्या. यात २ रिंगणात असून ४ परत घेण्यात आले. तर आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून दाखल झालेल्या ८ नामनिर्देशनापैकी २ रिंगणात असून ६ परत घेण्यात आले.
व्यापारी मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या २ जागेसाठी ९ उमेदवारी दाखल झाल्या होत्या. त्यात ४ निवडणुकीच्या रिंगणात असून ५ उमेदवारी परत घेण्यात आल्या. तर हमाल मापाडी मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या १ जागेसाठी पाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. यात २ निवडणुकीच्या रिंगणात असून ३ नामनिर्देशन पत्र परत घेण्यात आले. अशा प्रकारे निवडून द्यावयाच्या १८ जागेसाठी एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत घुले यांनी दिली.
महाविकास आघाडीकडून सोसायटी सहकारी सर्वसाधारण संस्थेसाठी- मंचकराव मोहनराव पाटील ,किशन ईश्वरराव पाटील, बालाजी पुंडलिक कातकडे, रामदास गोविंद कदम ,सतीश प्रतापराव नवटक्के, संतोष प्रभूआप्पा रोडगे ,संजय तुकाराम पवार तर सोसायटी महिला गटातून –नागमोडे कैवल्या संतोष , पवार इंदुताई माधवराव . सोसायटी ओबीसी गट -चंद्रकांत पंढरीनाथ ,सोसायटी व्हिजेएनटी- केंद्रे यशवंत दत्तू. ग्रामपंचायत सर्वसाधारण गट –जाधव चंद्रशेखर विनायकराव ,शिवाजी सुभाषराव पाटील. ग्रामपंचायत एस.सी.गट –दुर्गे नारायण दिगंबर. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट –शिवाजी नर्सिंग खांडेकर.व्यापारी मतदार संघ –अनिल त्र्यंबक मेनकुदळे, धीरज नानासाहेब घोगरे तर हमाल मापाडी मतदारसंघातून– शेख जाफर आमिरसाब असे एकूण आघाडी कडुन १८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात शिल्लक राहिलेले आहेत.
भारतीय जनता पार्टीकडून सहकारी संस्था सर्वसाधारण- पाटील व्यंकट बालासाहेब ,कदम भास्कर किशनराव , गुट्टे हनुमंत वामनराव, सुरनर दत्ता ग्यानोबा, हंबीर निळकंठ रामराव ,होनराव निळकंठ बापूराव , बडगीरे ज्ञानोबा रामराव. सहकारी संस्था ओबीसी– आरदवाड ( रेड्डी) प्रविण मनोहर .सहकारी संस्था महिला –कदम मोहिनी शिवकुमार, मुंडे सुनंदा शरद .सहकारी संस्था व्हिजेएनटी -राठोड शेषराव आश्रोबा. ग्रामपंचायत सर्वसाधारण – मद्देवाड जीवनकुमार रामराव, दहिफळे व्यंकटराव नारायण.ग्रामपंचायत अनुसूचित जाती- कांबळे अण्णासाहेब रामकिशन. ग्रामपंचायत आर्थिकदुर्बल- सूर्यवंशी महेश राजपाल तर व्यापारी गटातुन – पाटील धनराज भगवानराव ,शेटे विलास दयासागर आणि हमाल मापारी गटातून- सय्यद मुस्तफा इब्राहिम आदि १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. तर लक्ष्मण दत्तात्रय गुट्टे हे एकमेव अपक्ष उमेदवार राहिल्याचे समजते.
आज उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच दोन्ही गटाकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.चिन्हाचे वाटप झाल्यानंतर प्रचार कार्याला चांगलीच गती येणार आहे.