बालकांवर संस्कार करणे काळाची गरज – चारुदत्त बुवा आफळे

बालकांवर संस्कार करणे काळाची गरज - चारुदत्त बुवा आफळे

उदगीर (एल.पी.उगीले) : सक्षम समाज निर्मितीसाठी बालकांवर संस्कार करण्याची गरज आहे. रामरक्षा व हनुमान चालिसा बालकांना शिकवणे व दैनंदिन पठण करून घेणे, यात विशेष करून माता भगिनींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केले. उदगीर येथील स्वामी विवेकानंद वसतिगृहाच्या मैदानावर भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी “जन्मोत्सव व सनातन हिंदु धर्म आचार व विचार” या विषयावर ते उपस्थित भक्तांना उपदेश करीत होते.यावेळी उपदेश करताना आफळे बोलत होते. पुढे बोलताना आफळे म्हणाले की, ब्राह्मण समाजाने नेहमीच आपल्या उपासनेच्या व नित्योपचाराच्या माध्यमातून राष्ट्रहित व धर्मरक्षण करण्याचे काम केले आहे. अलीकडच्या काळात उपासनेपासून दूर चाललेल्या तरुणांनी पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाचा आदर्श इतरांनी घ्यावा, यासाठी पुढे यावे. असा उपदेश आफळे बुवा यांनी केला.

प्रारंभी गोपाळ जोशी व श्याम कुलकर्णी भक्तीसंध्या कार्यक्रम पार पडला. त्यानंतर श्री भगवान परशुराम यांच्या 7 फुटी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जन्मोत्सवसाठी सहकार्य करणाऱ्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये भरतराव बुधोडकर कुलकर्णी, श्रीपाद देशमुख, संतोष धाराशीवकर, अॅड लक्ष्मीकांत मध्वरे, देवीदास बाहुबळ, शरदराव कुलकर्णी, शिवशंकर कुलकर्णी, व्ही एस कुलकर्णी, अॅड उपेंद्र महाजन, शंकरलिंग मठाचे मठाधिश सुखदेव स्वामी , शंकरराव लासुणे, मयुर कुलकर्णी, आप्पाराव कुलकर्णी, सतीश पाटील, संतोष कुलकर्णी, शिवाजी पांडे, प्रल्हादबुवा रामदासी यांचा समावेश होता.

प्रास्ताविक प्राचार्य श्रीपाद सीमंतकर यांनी केले, सूत्रसंचालन मंजुषा कुलकर्णी, अश्विनी देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी देविदास भाऊबाळ, ऋषिकेश द्वेपायन, नरेंद्र घनपाटी, विजय कुलकर्णी, विवेक कुलकर्णी, अंकुश कुलकर्णी, विलास महाराज बुधोडकर, बबन कुलकर्णी, व्यास द्वैपायान, विठ्ठल सोमपुरकर, आदित्य कुलकर्णी यांच्यासह श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

About The Author