लाल बहादुर शास्त्री विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

लाल बहादुर शास्त्री विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी संस्था सदस्य भगवानराव पाटील गंगनबिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. लाल बहादुर शास्त्री, योगी अरविंद, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा कार्यवाह शंकरराव लासुणे, रामकृष्ण सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, माजी शालेय समिती अध्यक्ष संतोष कुलकर्णी, स्वामी विवेकानंद वसतीगृहाचे अध्यक्ष षन्मुखानंद मठपती, बालवाडीच्या अध्यक्षा श्रीमती अंजलीताई नळगीरकर, श्रीपत कोटलवार, संस्था सदस्य मोहिनी आचोले,मेघ:श्याम कुलकर्णी,चंद्रकांत धनबा, परमानंद निलंगे, गजानन जगळपुरे, सतीश पाटील, प्रीती जालनापुरकर, अंबिका जेवळीकर, नीता मोरे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले, पालक संजय हूल्ले हे मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पंकज देशमुख म्हणाले, “01मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यांचे बलिदान संपूर्ण महाराष्ट्र सदैव लक्षात ठेवेल.” भगवानराव पाटील गंगनबिडकर म्हणाले, ” महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. हा वारसा सर्वांनी मनापासून जतन केला पाहिजे. ” अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे प्रचंड मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि आज तागायत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हीरीऱीने सहभाग घेतल्याचे सांगितले.संचालन आशा गौतम, प्रास्ताविक बालाजी पडलवार , स्वागत व परिचय आरती तेलंग, गीत मृदुला शास्त्री व मयुरी वट्टमवार यांनी गायले. आभार विनायक इंगळे यांनी व्यक्त केले. किरण नेमट यांनी शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रम प्रमुख म्हणून माधव मठवाले यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

About The Author