विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी – गंगाधर दापकेकर
उदगीर(एल.पी.उगीले) : विद्यार्थी महाविद्यालयातून ज्ञानाची शिदोरी आपल्या सोबत घेऊन समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करतात.त्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयाचे खूप मोठे योगदान असते. महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबत त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. हाच विद्यार्थी पुढे राष्ट्र निर्मितीचे कार्य करतो.याच दृष्टिकोनातून शिवाजी महाविद्यालयाने विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे व सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाचे महत्त्वपूर्ण कार्य बहुजन हिताय बहुजन सुखाय या सूत्रातून केले आहे. महाविद्यालयाची ही दृष्टी घेऊन माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे मत शिवाजी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थी गंगाधर दापकेकर सचिव नंदिग्राम कृषी व ग्राम विकास संस्था सुगाव यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते, तर व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष नामदेव चामले, सदस्य पृथ्वीराज पाटील एकंबेकर ,एम डी जाधव, माजी प्राचार्य डॉ विनायक जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एम. नवले,उपप्राचार्य डॉ एस व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा.जी जी सूर्यवंशी यांची होती.
पुढे बोलताना दातकेकर म्हणाले,या महाविद्यालयाने अनेक क्षेत्रात विद्यार्थी घडवले. त्यांचा सर्वांगीण विकास जोपासला, त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थी आपला नावलौकिक निर्माण करत आहे, असेही म्हटले .यावेळी संस्थेचे सचिव ज्ञानदेव झोडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यातून नैतिकता जोपासावी व आपल्या संस्थेचे नावलौकिक करावे. माजी प्राचार्य विनायक जाधव म्हणाले, विद्यार्थी ज्या क्षेत्रात कार्य करत आहेत, त्या क्षेत्राशी त्यांनी कृतज्ञ राहावे. व स्वतःबरोबर महाविद्यालयाचाही नावलौकिक वाढवावा. माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य एम डी जाधव यांनी माजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महाविद्यालयाचे योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे आम्ही सतत कृतज्ञ राहू असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ अमित कोठाळे, डॉ चिंते,डॉ राजश्री जाधव, डॉ जितेंद्र शेळके,डॉ राजकुमार बिरादार, लक्ष्मण कुंडगीर सरपंच मौजे कल्लूर,डॉ विजय कलुरकर या सर्वांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे कार्य अनमोल असे राहिले आहे. त्यामुळेच आम्ही उच्च पदावर गेलो आहोत, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. ए.एम नवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ सुरेश शिंदे यांनी तर आभार डॉ एस एम कोनाळे यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.