छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न..!
अहमदपूर ( गोविंद काळे ) कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदपूर आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबिराचे उद्घाटन आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी केले. महाराष्ट्र कुशल व रोजगार संपन्न व्हावा आणि युवा लोकसंख्या अधिक प्रमाणात असलेल्या आपल्या देशात तरुणांसाठी शिक्षणाची ही गंगोत्री कायम प्रवाही असावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले. दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध आहेत,
पारंपारिक शिक्षण घेताना युवकांच्या कौशल्याचा विकास व्हावा अन् पालकांना ही योग्य मार्गदर्शन मिळावे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
दहावी, बारावी नंतर करिअरच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, भविष्यातील तंत्रज्ञान व रोजगार संधी, शैक्षणिक शिष्यवृती योजना आदी विषयांवर युवकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अहमदपूर उपविभागीय अधिकारी श्री. प्रवीण फुलारी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे श्री. धनंजय गुडसुरकर, तहसीलदार श्री. पी.पी. कुलकर्णी, API श्री. शैलेश बंकवाड उपस्थित होते. तसेच कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालयाचे डॉ.श्री. जी. के. शिळे, नारायण इन्स्टिट्युट ऑफ चे डॉ. श्री. व्ही. एल.राठोड, श्री. श्रीकांत लोंबोळे, श्री. डी. आर. बजाज यांनी विद्यार्थी, युवकांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. एस.बी. वाघमारे, अहमदपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. एस.आर कवलेकर, सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार विभाग श्री. बी.एस. मोरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था गटनिदेशक एम.आर. काकनाटे तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.