उदगीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आ. सुधाकर भालेराव यांच्याकडे दिल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य – सुनील सावळे

उदगीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आ. सुधाकर भालेराव यांच्याकडे दिल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य - सुनील सावळे

उदगीर: २०२४ मध्यो होणाऱ्या लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाने आत्तापासूनच कंबर कसली असून मागील पंचवार्षीक काळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघावर करडी नजर ठेवली आले. कर्नाटकमधील झालेल्या पराभवाचा ही परिणाम झाला असून पक्षातील गटबाजी दूर करून स्थानिक मतदारसंघात ज्या नेत्याचे प्रभूत्व आहे, व त्याच्या मागे मतदार खंबीरपणे उभा आहे, अशा लोकप्रिय नेत्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघाची रचना तयार केली असून ज्या त्या मतदारसंघात स्थानिक पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपाला सक्षम करण्यासाठी व २०२४ मध्ये पुन्हा भाजपाला राज्यात व केंद्रात सत्ता आणायचे असले तर त्यापूर्वी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका जिंकने आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक नगर पालिका, महानगर पालिका, जि.प., प. स.च्या निवडणूकाचा कार्यकाळ संपून एक ते दोन वर्ष होत असले तरीही केवळ ओबीसी आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे, व राज्यात महाविकास आघाडीला घरी बसवून शिंदे – शिवसेना व भाजपाची सत्ता महाराष्ट्रातल आली आहे. याच संधीचे सोने करण्यासाठी केंद्रातील व महाराष्ट्रतील भाजपाने योग्य अशी रणनिती आखल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांची निवड झाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते दुप्पट जोमाने कामाला लागल्याची माहिती सुनील सावळे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, उदगीर विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहिल्यास मतदारसंघातील खऱ्या जनविकास कार्याचा लेखाजोखा पाहिला तर २०१९चे दावेदार माजी आमदार भालेराव हेच होते, पण पक्षातील अंतर्गत गटबाजीने उदगीरची जागा गमावली. त्याचा परिणाम सध्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकारभारावर जनता नाराज असून निवडणूका केंव्हा होतील? याचीच जनता वाट पाहात आहे. माजी आ. सुधाकर भालेराव यांना या पंचवार्षीक काळात अ.जा. मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष करून उदगीर विधानसभा व्यतिरीक्त महाराष्ट्राची जबाबादारी देऊन पाहिली, त्यात सुधाकर भालेराव यांना यश आले. व पक्ष श्रेष्ठींच्या विश्वासात पात्र ठरले. यामुळे यावेळेस उदगीर विधानसभा गमवायची तर नाहीच याचसोबत त्याच्या सक्षम नेतृत्वशैलीमुळे अहमदपूर, लातूर ग्रामीण आदी मतदारसंघावरही सत्ता काबीज करायची आहे.
विधानसभा निहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये सर्वांचे लक्ष उदगीर विधानसभा मतदारसंघावर लागले असून गेल्या दोन पंचवार्षीक कार्यकाळत माजी आ. सुधाकर भालेराव यांचा पगडा मजबूत असल्यामुळे व पक्ष श्रेष्ठींनी माजी आ.सुधाकर भालेराव यांच्यावर विश्वास टाकला असून पक्षातील स्थानीक गटाबाजी दूर करण्यासाठी व स्थानिक स्वराज्य संस्था निवडूण आणण्यासाठी एकहाती नेतृत्वाची गरज आहे, व याची धमक केवळ सुधाकर भालेराव यांच्यात असून राखीव मतदारसंघ जरी असला तरीही त्यांच्या कार्यशैली व नेतृत्वातून भेदभाव दिसून येत नाही. प्रशासन असो, व्यापारी, उद्योजक, विधीज्ञ, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतीक आदी क्षेत्रातील लोक त्यांच्या पाठीमगे असल्याचे दिसून येते. मागील वर्षाच्या कार्यकाळात उदगीरचा कायापालटच करून मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये सक्षम ठरले आहेत. २०१६ मधली उदगीर नगर परिषद, जि.प., प.स. च्या निवडणूका असो स्वबळावर एकहाती सत्ता काबीज केली होती. तरीही पक्षातील अंतर्गत गटबाजी व बाहेरील नेतृत्वाच्या बेदखल पणामुळे त्यांना घरी बसावे लागले. पण आता पक्षाने दिलेल्या जबाबदारीवरून असेच दिसते की, उदगीर मतदारसंघातील गटबाजी थांबवण्यासाठी एक हाती नेतृत्वाची गरज आहे. व यात सुधाकर भालेराव हेच सक्षम ठरू शकतात. कारण आजही त्यांची मतदारसंघावर पकड असून भविष्यात लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचेही नेतृत्व करण्यास ते पात्र आहेत. उदगीर मतदारसंघातील भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी आता एकदिलाने भालेराव यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे असून यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्ता काबीज करण्यासाठी व मतदारसंघातील उर्वरीत विकास कामे करण्यासाठी गावपातळीपर्यंत पोहंचून पक्ष संघटन मजूबत करणे गरजेचे आहे. सध्या मतदारसंघात चालू असलेले राजकीय रणकंदन हे हितकारक नसून जाती, धर्मात तेढ निर्माण करणे, विकास कामाच्या नावावर कोट्यावधीचा निधी मंजूर करून टक्केवारीतून विकास कामात खिळ पाडणे हे जनता ओळखून आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या स्थानिक निवडणूका सोबतच लोकसभा व विधानसभाही जिंकणे भाजपसाठी गरजेचे आहे.त्या साठी माजी आ.भालेराव सक्षम आहेत,असा विश्वास सुनील सावळे यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यामध्ये आता उत्साह निर्माण झाला असेल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह युवक कार्यकर्त्यांनी चौकात चौकात फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे, नगर परिषदेचे माजी सदस्य आनंद बुंदे, रामेश्वर पवार, लिंबगाव चे सरपंच विनायक सूर्यवंशी, तातेराव शिंदे अंबादास देशमुख, कपिल शेकापुरे, प्रदीप महापुरे, कपिल मादळे, वैजनाथ उल्ले, नटवर सकट, उद्धव गायकवाड, बळीराम चव्हाण, बाळू फड, रामदास भोसले, सुनील गुडमेवार, महेश येरकुंडे, विष्णू लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

About The Author