गंभीर गुन्हयातील दोन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

गंभीर गुन्हयातील दोन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

लातूर (एल.पी.उगीले) : जानेवारी- 2023 मध्ये पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील एकास खंडणी वसूल करण्यासाठी अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली होती. त्यावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी पंकज श्यामसुंदर पारिख व त्याच्या साथीदार समीर राजासाब सय्यद यांच्या विरोधात पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 08/2023 कलम 307, 364(अ), 386,109,323, 504, 506, 34 भादवी, 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम व 4, 25 शस्त्र अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचे आरोपी फरार होते.
आरोपीचे शोध कामी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली वर नमूद गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी शोध कामी स्थागुशा येथील पोलीस अधिकारी व अमलदारांचे विशेष पथक आरोपी विविध ठिकाणी पाठविण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्या करिता पथकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करत होते. नमूद गुन्ह्यातील गुन्हेगार सराईत व सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचे असल्याने पोलीस आपला शोध घेत आहेत हे समजल्याने सतत राहण्याचे ठिकाणे बदलत होते. तरीपण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठांचे मार्गदर्शनात फरार आरोपींचा गेली पाच महिन्यापासून विविध मार्गाने माहिती काढून कसून शोध घेत होते. तसेच सदर पथके आरोपीचे शोध कामी वेगवेगळया भागात रवाना केले होते.
त्या दरम्यान दि.08/6/2023 रोजी तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की गुन्ह्यातील फरार आरोपी खर्डेकर स्टॉप परिसरात येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने खर्डेकर स्टॉप परिसरात सापळा लावून गुन्ह्यातील फरार आरोपी नामे पंकज श्यामसुंदर पारिख ,(वय 26 वर्ष, राहणार भोकरंबा ,तालुका रेणापूर जिल्हा लातूर), समीर राजासाब सय्यद ,(वय 20 वर्ष, राहणार खाडगावरोड,लातूर )यांना अतिशय सीताफिने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी नामे पंकज श्यामसुंदर पारिख याचेवर लातूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी वसुली, घातक अग्निशस्त्र बाळगणे, त्याचा वापर करणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी नामे समीर राजासाब सय्यद याचे वर मारामारी करणे, धमक्या देणे, जबरी चोरी करणे असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम करून अतिशय कुशलतेने माहिती मिळवून आरोपीस अटक केली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, राजेश कंचे ,रवी गोंदकर, राहुल कांबळे, मनोज खोसे ,प्रदीप चोपणे यांनी केली आहे.

About The Author