डॉक्टर अमन मुलानी यांच्या जीवनज्योती हॉस्पिटलचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
लातूर : (प्रतिनिधी) – लातूर शहरापासून जवळच असलेल्या बारा नंबर पाटी, शाम नगर येथे डॉक्टर अमन मुलानी (एम. डी.) यांच्या जीवनज्योती हॉस्पिटलचे ज्येष्ठ पत्रकार, लोकाधिकारप्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी प्रमुख पाहुणे तथा जीवनज्योती हॉस्पिटलचे उद्घाटक व्यंकटराव पनाळे यांचा दिलखुश मुलानी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे डॉ. राम गाजधने, शिवलिंग धुमाळ, नरेंद्र बनसोडे, किरण वाकुरे, अल्लाबक्ष शेख, विनायक चव्हाण, लक्ष्मण सुडे, डॉ. जितेन जयस्वाल, डॉ. सदानंद कांबळे, डॉ. रमण महाळंगीकर, डॉ. अयाज शेख, डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, डॉ. आनंद साळुंखे, डॉ. उमाकांत जाधव, इरफान सय्यद, खलील शेख, हाजी इमाम शेख यांचा शाल, पुष्पहार देऊन मुलानी परिवाराच्यावतीने डॉ. अमन मुलानी, डॉ. अजमल मुलानी व अन्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यंकटराव पनाळे यांनी उद्घाटन पर भाषण करताना भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एक विश्वासार्हतेच नाव म्हणून डॉ. मुलानी हे समाजासमोर येतील, असा विश्वास व्यक्त केला. मुलांनी परिवाराकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य होत आलेल आहे, असे सांगितले.
यावेळी डॉ. जितेन जयस्वाल, विनायक चव्हाण, किरण वाकुरे यांनीही शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर उमाकांत जाधव यांनी तर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे व नागरिक बांधवांचे आभार खलील शेख यांनी मानले. कार्यक्रमास शाम नगर, हरंगुळ, खंडापूर, चिंचोलीराव, चिंचोलीराव वाडी, आदी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.