नागतिर्थवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश उत्सव उत्साहात साजरा

नागतिर्थवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश उत्सव उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा परिषद शाळा व ग्राम पंचायत कार्यालय, नागतिर्थवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नागतिर्थवाडी ता. देवणी जि. लातूर येथे जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्याना बैलगाडीत बसवून , ढोल व लेझिम पथक घेवून गावातून फेरी काढण्यात आली.

शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या व अगोदर शाळेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फुल देवून व त्यांचे औक्षण करून, शाळेत पहिले पाऊल घेण्यात आले. जिलेबी भरउन तोंड गोड करण्यात आले, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, व त्याच बरोबर त्यांची वजन व उंची याची नोंद घेण्यात आली.

शाळेत आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. व शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले होते.

यावेळी देवणी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी व्यंकटराव बोइनवाड, तळेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख ज्ञानोबा कार्ले, गावचे सरपंच राज गुणाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे, उपाध्यक्षा अनुराधा बुगे, अंगणवाडी शिक्षिका पंचफुला गुणाले, मदतनीस पार्वतीबाई उंचे, माजी सरपंच तुकाराम येलमटे, ग्रामस्थ व्यंकटराव कासले , चंद्रप्रकाश गुणाले, व्यंकट पेठे,लक्ष्मण पेठे, भरत पेठे, योगेश कासले,हरिश्चंद्र गुणाले, नरसिंग गिरी, नामदेव कासले, ब्रम्हानंद उंचे, शिवाजी उंचे, माता पालक शामल रामासने, यशोदा उंचे, मथूराबाई गिरी यांच्या सह अनेक पालक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अश्विनीकुमार गुंजरगे, सहशिक्षिका अमरजा शिरूरे यांनी परिश्रम घेतले.

About The Author