उदगीरात धरणे आंदोलन संपन्न

उदगीरात धरणे आंदोलन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्रात दलित मुस्लिमांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात उदगीर येथे समाजबांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी दलित व मुस्लिम समाजावर अन्याय, अत्याचार मोठ्या संख्येने होत असून नांदेड येथील बोनधार येथे भीम जयंती का साजरी केली? म्हणून अक्षय भाऊ या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. रेनापुर जिल्हा लातूर येथे मातंग समाजाचे गिरीधर तपघाले यांचा तीन हजार रुपयांच्या कर्जवसुलीसाठी निर्घृण खून करण्यात आला. मुंबईतील सावित्रीबाई वस्तीगृहात शिकणाऱ्या मागासवर्गीय तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा. या मागणी साठी उदगीर शहरात समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देविदास कांबळे, भन्ते नागसेन बोधी, उषा कांबळे, मोहसीन खान, धनाजी बनसोडे, दिलीप कांबळे, वेंकट बर्गे, गजानन सताळकर, एड. प्रफुल्लकुमार उदगीरकर, सुशीलकुमार शिंदे, राहुल कांबळे, नितीन गायकवाड, बापूसाहेब कांबळे, संजयकुमार कांबळे, बाबासाहेब सूर्यवंशी, किशाबाई कांबळे, माया कांबळे, भारती सूर्यवंशी, विठ्ठल कोल्हे, विलास गायकवाड, विद्यासागर डोरनाळीकर, कमलाकर सांगवीकर, एस. डी. कांबळे, संजय काळे, अहमद सरवर, प्रदीप महापुरे, अविनाश गायकवाड, साबिर पटेल, सचिन जाधव, सिद्धार्थ शिंदे, अमोल शृंगारे, अतुल घोडके, नामदेव बामणे, शिवमूर्ती उमरगेकर, निवृत्ती भाटकुळे, सतीश वाघमारे, मिलिंद बनसोडे, राहुल सोनवणे, सुदर्शन सांडुळकर, आकाश कस्तुरे, दयानंद शिंदे, तलवारे प्रशांत, सोनकांबळे सागर, सोनकांबळे पिंटू, वैशाली कांबळे, उमा काळे, शिल्पा गायकवाड, ज्योती कांबळे, सुधीर घोरपडे, शिवा कोळी, शुभम गायकवाड, संजय राठोड, शाहिद हाश्मी इत्यादी कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author