पक्षाने सोपवलेली जबाबदारी पूर्ण ताकतीने पूर्ण करणार — माजी आमदार भालेरावभालेराव व आंबेसंगे यांचा सत्कार संपन्न
उदगीर(एल.पी.उगीले)
भारतीय जनता पक्षाने उदगीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने आपल्यावर सोपवली आहे. दहा वर्ष या विधानसभा मतदारसंघाचा कर्तबगार आमदार म्हणून जनतेने प्रेम दिले ते प्रेम आणि मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत पुन्हा या मतदार संघाला भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास भाजपचेअनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी व्यक्त केला आहे. ते भा ज पा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्या बद्दल रतिकांतजी अंबेसंगे व उदगीर विधानसभा प्रमुख पदी माजी आ.सुधाकरजी भालेराव याची निवड झाल्याबदल शिवशींपी समाज बांधव व नगरसेवक अमोल दिलीप अणकल्ले यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बोलत होते. याप्रसंगी लातूर जिल्हा परिषद माजीअध्यक्ष राहुलजी केंद्रे व दिलीप अणकल्ले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याप्रसंगी अमोल अणकल्ले, दिनेश अंबेसंगे, नागराज अंबेसंगे, शैलेश नेरूणे ,रमेश अंबेसंगे, रवि हंसरगुडे, बालाजी आदेप्पा, शिवाजी वडजे, अरविंद अंबेसंगे, संदिप ममदापुरे, अशोक बेबंळगे, संग्राम तानशेटे, बलभीम अणकल्ले, संतोष लाला, प्रसाद अणकल्ले, सूर्यकांत आदेप्पा,
संजय पाटील, सुनील सावळे, माधव टेपाले, अभय पारसेवार, रमेश झिल्ले, नितीन पांढरे, व समाज बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार भालेराव यांनी स्पष्ट केले की, उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी दहा वर्ष आपण अनेक योजना आणल्या, उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मात्र मध्यंतरीच्या काळात काही समज गैरसमजातून पक्षांतर्गत गटबाजी झाली, आणि पक्षश्रेष्ठीकडे आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बदलले गेले, ही झालेली चूक आता दुरुस्त करून पुन्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनवण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे कामाला लागावे, असेही आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.