जयक्रांती कॉलेज ऑफ ऐज्युकेशन येथे कॅम्पस मुलाखतीचे यशस्वी आयोजन
लातूर (प्रतिनिधी) : जयक्रांती कॉलेज ऑफ ऐज्युकेशन, लातूर मधिल प्लेसमेंट सेल वतीने दि.18 जून रोजी लातूर व लातूर परिसरातील विविध नामांकित शाळांमध्ये शिक्षक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रमोद तांदळे यांनी केले.यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे सचिव प्रा.गोविंदरावजी घार यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.येस्के मॅडम यांनी केले तर संचालन प्रा.विक्रम जाधव यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये एम.डी.ए.स्कूल कोळपा, डी.बी.स्कूल,महाळग्रा, श्री माध्यमिक विद्यालय, लातूर,जयक्रांती माध्यमिक विद्यालय, लातूर, आदर्श शैक्षणिक संकुल, लातूर,विश्वभारती उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर,अंकुर बालविकास केंद्र, लातूर.अशा विविध शाळांमध्ये विविध विषया करीता एकूण 78 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.या मुलाखती करीता प्रत्येक शाळांमधील प्रतिनिधीनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या.यात काही शाळांनी तात्काळ पात्र शिक्षकांना नियुक्ती पत्र देखील दिले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता प्राचार्य डॉ.प्रमोद तांदळे,प्रा.डॉ.येस्के मॅडम प्रा.डॉ.दिलीप गुंजरगे,श्री अमर येळबकर,प्रा.डॉ. सुशील शिंदे,प्राचार्य यादव जे.डी., प्रा.हिंगणे संगीता,प्रा.शरद पाडे,प्रा.सिंधीकुमठे विश्वनाथ ,गोविंद कांबळे,राजू रायबोळे,बालाजी कांबळे, मोहन कांबळे हे उपस्थित होते.
या मुलाखती करीता प्लेसमेंट सेलच्या प्रा.सोमनाथ पवार व प्रा.विक्रम जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. या मुलाखती यशस्वीपणे पार पडल्या.