अहमदपूर येथे पॅंथरच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन.
अहमदपूर ( गोविंद काळे): दलित पॅंथरच्या स्थापनेला 50 वर्ष झाले असल्याचे औचित्य साधून येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने पॅंथरच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दलित पॅंथरच्या स्थापनेला पन्नास वर्षे झाल्याचे औचित्य साधून 1972 ते 1977 या कालावधीत लातूर जिल्ह्यातील ज्या पॅंथर्स ने दलित समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार प्रकरणी जीवाची रान करून जीवाची परवा न करता दलित पॅंथरच्या माध्यमातून जे समाजकार्य केले त्याचा कृतज्ञता सोहळा दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव कृतज्ञता सोहळा कर्मचारी समितीच्या वतीने अहमदपूर येथील संस्कृती लाॅन्स येथे 25 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता गोल्ड मेडल सन्मान पत्र शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नारायण कांबळे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. श्रीरंग खिल्लारे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी समितीचे पदाधिकारी प्रा. डॉ. रूपसेन कांबळे, विलास चापोलीकर, बा. ह. वाघमारे, प्रभाकर कांबळे, बालाजी तुरेवाले, माधव तिगोटे, चंद्रशेखर भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील सर्व परिवर्तनवादी संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव कृतज्ञता सोहळा कर्मचारी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.