संपर्क से समर्थन अभियान अंतर्गत मोटार सायकल रॅलीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – बसवराज रोडगे

संपर्क से समर्थन अभियान अंतर्गत मोटार सायकल रॅलीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - बसवराज रोडगे

उदगीर (एल. पी. उगीले) : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकीर्दीला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केलेल्या विकास कामाची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी. तसेच समाजातील प्रतिष्ठित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करून सत्कार करणे, आणि केंद्र शासनाबद्दलच्या त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने “संपर्क से समर्थन अभियान” सुरू केले आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणूनच भारतीय जनता पार्टी उदगीर विधानसभा मतदार संघाच्या वतीने, उदगीर शहरात मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश आप्पा कराड, लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकरराव शृंगारे, उदगीर विधानसभा मतदारसंघाची नव्याने जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे ते माजी आमदार सुधाकरराव भालेराव हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व इतर प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रॅली संपन्न होणार आहे. या रॅलीला युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सहभागी व्हावे. असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे यांनी केले आहे.

उदगीर शहरातून ललित भवन मंगल कार्यालय ते कॅप्टन कृष्णकांत चौक पर्यंत ही मोटर सायकल रॅली दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी सव्वा दहा वाजता सुरू होणार असून भारतीय जनता पक्षाच्या सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या सुजाण मतदारांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा. त्यासाठी सकाळी दहा वाजता रॅलीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या रॅलीसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रदेश कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत. या रॅलीच्या समारोपात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवावी. असेही आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author