नागतिर्थवाडी येथे लोकनेते संभाजी भैया यांच्या वाढदिवसा निमित्त विवध लोक उपयोगी कामांचे लोकार्पण
उदगीर (एल.पी.उगीले) : लोकनेते माजी मंत्री तथा निलंगा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर व लोकप्रतिनिधी देवणी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा उदगीर येथील स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन शंकररावजी पाटील तळेगावकर यांच्या वाढदिवसा निमित्त नागतिर्थवाडी ता. देवणी जि. लातूर येथे गावात राबविण्यात आलेल्या विवध लोक उपयोगी कामाचे लोकार्पण सर्व गावकाऱ्यांच्या समवेत करण्यात आले.
नागतिर्थवाडी येथील ग्राम पंचायत, कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी यांना ISO नामांकन प्रमाणपत्र वाटप,गावात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या सोलार संचचे लोकार्पण (ग्राम पंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, हनुमान मंदिर, बोअरवेल) , रीडिंग रूम (अभ्यासिका) चे लोकार्पण, गावात 35 विद्युत पोलवरील LED लाईट चे लोकार्पण, गावातील 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार, सम्मान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक कमलबाई नागनाथ रामासने यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. त्याच बरोबर जिल्हा परिषद शाळेच्या बदली होऊन गेलेल्या सहशिक्षिका शारदा गुंगे यांचा निरोप व नव्याने रुजू झालेल्या सहशिक्षिका अमरजा शिरुरे यांचे स्वागत यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवणी पंचायत समिती देवणी चे माजी उपसभापती शंकररावजी पाटील तळेगावकर यांची उपस्थित होती.गावचे सरपंच राज गुणाले, माजी सरपंच तुकाराम पाटील, तुकाराम येलमटे, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले, ग्राम पंचायत सदस्य भानाबाई कासले, कमलबाई रामासने, वर्षाराणी येलमटे, प्रतिभा कासले, नरसिंग गुरुडे, गावचे भूमिपुत्र देशसेवेसाठी आर्मी मध्ये रुजू असलेले मेजर गोविंद येलमटे, सेवा निवृत्त शिक्षक ज्ञानोबा येलमटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे, शिवाजीराव गुणाले,तुकाराम गुरुडे, किसन येलमटे,रामराव रामासने, ज्ञानोबा रामासने, विठ्ठल सुडे,मधुकर कासले, लक्ष्मण पेठे, भरत पेठे, व्यंकटराव कासले, नरसिंग रामासने, भागवत गुणाले,विठ्ठल गुणाले, व्यंकट गुणाले, लक्ष्मण गुणाले, नरसिंग गिरी, दत्ता येलमटे,राम गुरुडे, दयानंद उंचे, शिवाजी उंचे, ब्रह्मानंद उंचे यांच्या समवेत गावातील महिला , शालेय विध्यर्थी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.