स्वामी विवेकानंद महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाद्वारे दि.27/06/2023 रोजी “ग्रंथालयीन पारंपरिक साधने व सेवा यावर ई- संसाधने व ई- सेवा यांचा वाढत असलेला प्रभाव” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर गुलबर्गा विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. सुरेश जंगे, अन्नामलाई विद्यापीठ चेन्नई येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सादिक बच्चा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील इंग्रजी विषयाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहिदास नितोंडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील ग्रंथपाल डॉ. जगदीश कुलकर्णी, कर्नाटक पशुवैद्यकीय व मत्स्यपालन शास्त्र विद्यापीठ बिदर येथील ग्रंथपाल डॉ. यु. एस. जाधव, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदरील परिषद ही चार सत्रात होणार असून सकाळी 10:15 वाजता उदघाटन सत्र पार पडणार आहे, तर दुपारच्या सत्रात तज्ञांचे विषयानुरूप मार्गदर्शन होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेला सर्व शाळा व महाविद्यालयातील ग्रंथपाल,शिक्षक व विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रीय परिषदेचे सयोजक डॉ. शेषनारायण जाधव, सह सयोजक प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी केले आहे.

ही राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा.राहुल पुंडगे, प्रा. संजीवनी भालेराव, प्रा.उषा गायकवाड, ग्रंथपाल शकुंतला सोनकांबळे, प्रा. ऋतूजा दिग्रसकर, प्रा. आकाश कांबळे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. राखी शिंदे, प्रा. रशीद दायमी,प्रा. आसिफ दायमी, अमोल भाटकूळे, महेश हुलसुरे, सादिक शेख इ. परिश्रम घेत आहेत.

About The Author