खेलो इंडियातील सुवर्ण कन्यांचा किलबिल कडून सत्कार……

खेलो इंडियातील सुवर्ण कन्यांचा किलबिल कडून सत्कार……

अहमदपूर: ( गोविंद काळे)

  नुकत्याच मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथे खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा पार पडल्या . सदरील स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेच्या विद्यार्थीनी कु. माही किशोर आरदवाड व जान्हवी गणपतराव जाधव यांनी तलवार बाजी खेळात अनुकमे 2 सुवर्ण, 1 सिल्वर व 1 ब्राँझ मेडल मिळवून अतिशय चांगल्याप्रकारे यश संपादन केले. यामध्ये शासनाकडून माही आरदवाड हिला 8   लक्ष रुपये तर जान्हवी जाधव हिला 7 लक्ष रुपये बक्षीस मिळाले. या यशामध्ये त्यांचे  मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा दत्ताभाऊ गलाले, प्रशिक्षक वजिरोद्दिन काझी, पालक किशोर आरदवाड व गणपतराव जाधव यांनी अतिशय मेहनत घेऊन अशा खेळाडूंना घडविले. विशेष म्हणजे  जान्हवी ही सर्वात कमी वयात खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहभागी होऊन मेडल मिळवणारी पहिली खेळाडू आहे. या सुवर्ण यशाबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील पर्यवेक्षक महावीर गोडभरले, लक्ष्मण थोटे, सचिन जगताप, राजकुमार कदम आदींनी  दोघींचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.

About The Author