संघर्ष केल्यानेच ध्येय साध्य होते — प्राचार्य सय्यद
उदगीर (प्रतिनिधी) : जिवनात प्रतेक गोष्टींसाठी संघर्ष करावाच लागतो, ते क्षेत्र कोणततेही असो; संघर्ष केल्याशिवाय जिवणात ध्येय साध्य करता येत नाही, असे प्रतिपादन तोंडार येथील आयोजित एम पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात हाळी येथील विद्यावर्धीनी हायस्कूल चे प्राचार्य रफीक सय्यद यांनी केले.
या सत्कार सोहळ्यासाठी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून पांचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच भरत कोचेवाड, उपसरपंच प्रयागबाई नांवदे, ओम् साई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे, इक्बाल परकोटे,माधव पाटील, जळकोट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा परकोटे, उदगीर न्यायालयाचे सरकारी वकील जावेद परकोटे, प्राचार्य रफीक सय्यद, प्रा. ईमरान परकोटे, महाराष्ट्र पोलीस सुलेमान परकोटे, सहशिक्षक अझर परकोटे, कर्मचारी लाला शेख,ई मान्यवर उपस्थित होते, या वेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा माशाअल्लाह ग्रुप चा वतीने एम पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली ते सत्कार मुर्ती तोंडार चे सुपुत्र अतिक एक्बाल परकोटे, व मंत्रालय मध्ये लिपिक पदावर नियुक्ती झाली ते नितीन बिरादार व सर्व मान्यवरांचा फेटा,शाल श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. पुढे संबोधित करताना सय्यद यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात कष्ट घेतले पाहिजे, त्या साठी मित्र परिवार व कुटुंबातील सदस्यांची साथ, त्यांची इच्छा असली पाहिजे, तरच तो व्यक्ती जिवनात काहीतरी करुन दाखवतो, हिच जिद्द, चिकाटी, सर्वांचा आधार, विचार एकत्र आल्याने आज तोंडारच्या मातीमधे जगलो, त्या मातीचे व गावाचं ऋण फेडण्यासाठी हजारो मुलं आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध पदांवर कार्यरत आहेत.असे मत व्यक्त केले, या वेळी ग्राम पंचायत सदस्य निळकंठ बिरादार,सागर लिंबाळे, सौ.पद्मीनबाई पांडे, जेष्ठ नागरिक विलास अण्णा बिरादार, बाबुराव भांजी, निलप्पा बिरादार,ॲड. प्रेम सांगविकर, ॲड.मंजुर पटेल, युवा शेतकरी संतोष पाटील,सह माशाअल्लाह ग्रुप तोंडार चे पदाधिकारी रउफ परकोटे, हमीद परकोटे,अखील परकोटे, गुलाब शेख,आदम वाडेकर, अस्लम वाडेकर,चॉंद वाडेकर,फेरोज परकोटे, फेरोज वाडेकर,अलाउद्दीन शेख, रउफ पठाण, जुबेर परकोटे, मुबारक परकोटे फयाज शेख सह माशाअल्लाह ग्रुप तोंडार चे अनेक पदाधिकारी व गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पत्रकार संदीप बी. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सुरज परकोटे यांनी केले. अध्यक्षीय समारोप राजेंद्र पाटील यांनी तर आभार अफरीन पटेल यांनी मानले.